शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार कलेसाठी सवलतीचे गुण

By admin | Updated: January 10, 2017 00:30 IST

पुढील वर्षीच्या शैक्षणिक सत्रात शास्त्रीय कला व चित्रकला या विषयात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीसाठी सवलतीचे १५ गुण देण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना दिलासा : पुढील शैक्षणिक सत्रापासून अंमलबजावणीअमरावती : पुढील वर्षीच्या शैक्षणिक सत्रात शास्त्रीय कला व चित्रकला या विषयात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीसाठी सवलतीचे १५ गुण देण्यात येणार आहे. २०१८ मध्ये दहावीला असणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. शास्त्रीय नृत्य, गायन व वादन यामध्ये ज्या विद्यार्थ्याने कमीत कमी ५ वर्षांचे शिक्षण मान्यताप्राप्त संस्थेतून घेतले असावे व त्याने मान्यताप्राप्त संस्थाची ३ परीक्षा उत्तीर्ण केली असल्यास १० गुण व ५ परीक्षा उत्तीर्ण केली असल्यास १५ गुण देण्यात येणार आहे. जे विद्यार्थी शास्त्रीय नृत्य, गायन व वादन या प्रकारात राष्ट्रीय, राज्यस्तरीय शिष्यवृत्ती प्राप्त करतील अशांना वाढीव २५ गुण दिले जाईल. ज्या संस्थांची नोंदणी सांस्कृतिक कार्य विभागाकडे असेल त्या संस्थेचे प्रमाणपत्र प्राप्त केलेले असल्यास विद्यार्थी ज्या शाळेत इयत्ता १० वी शिकत आहे, त्या शाळेच्या मुख्याध्यापकामार्फत ते तपासून प्रमाणित करण्यात येईल.विद्यार्थ्याने उत्तीर्ण केलेल्या परीक्षांप्रमाणे त्याला अतिरिक्त गुण देण्याची व राज्य मंडळाकडे कळविण्याची जबाबदारी संबंधित शाळा मुख्याध्यापकाची राहील. कला क्षेत्रातील शास्त्रीय गायन, नृत्य व वादन यापैकी कोणत्या प्रकारासाठी अतिरिक्त गुण दिले ते राज्य मंडळातर्फे संबंधित विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत नमूद केले जाईल.लोककलेसाठीही मिळणार सवलतीचे गुणइयत्ता ८, ९ व १० वी या शैक्षणिक वर्षात राज्य शासनातर्फे घेण्यात येणाऱ्या बालनाट्य स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या विद्यार्थ्यास अनुक्रमे १५ , १० व ५ अतिरिक्त गुण देण्यात् येणार आहे. तसेच इयत्ता १ ली पासून शालेय स्तरावर कोणत्याही वर्षी राष्ट्रीय स्तरावरील अभिनय पुरस्कार प्राप्त होणाऱ्या बाल कलाकारास १० अतिरिक्त गुण तसेच राज्य स्तरावर प्रस्तुत पुरस्कार प्राप्त होणाऱ्या बाल कलाकारास ५ अतिरिक्त गुण देण्यात येणार आहे.इंटरमिजिएट ग्रेड ‘ए’ साठी १५ गुणइंटरमिजिएट ड्रार्इंग ग्रेड परीक्षेतील ग्रेड ‘ए’ प्राप्त विद्यार्थ्यांना १५ गुण, ग्रेड ‘बी’ प्राप्त विद्यार्थ्यांना १० गुण व ग्रेड ‘सी’ प्राप्त विद्यार्थ्यांना ५ गुण देण्यात येणार आहेत. कला क्षेत्रासाठी असणाऱ्या दोन टक्के आरक्षणामध्ये शास्त्रीय गायन, नृत्य व वादन या कला प्रकारात प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यासोबत चित्रकलेची इंटरमिजिएट ड्रॉर्इंग ग्रेड परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील सत्रापासून समावेश करण्यात येणार आहे.