शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

मुलाने केली जन्मदात्याची हत्या

By admin | Updated: December 22, 2015 00:10 IST

जन्मदात्याला बेदम मारहाण करुन त्यांची हत्या केल्यानंतर प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून नैसर्गिक मृत्यूचा देखावा ...

पिंपरी येथील घटना : नैसर्गिक मृत्यू झाल्याचा देखावामोर्शी : जन्मदात्याला बेदम मारहाण करुन त्यांची हत्या केल्यानंतर प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून नैसर्गिक मृत्यूचा देखावा रचणाऱ्या कूपुत्रास मोर्शी पोलिसांनी अटक केली. ही घटना १६ डिसेंबर रोजी नजीकच्या पिंपरी येथे घडली. मध्यप्रदेशातील शेत विकून ट्रॅक्टर घेऊन देण्याची मागणी पूर्ण न केल्यामुळे पित्याला जीव गमवावा लागला.आरोपीचे नाव दिनेश शिवलाल डिगरसे (३०, रा. पिंपरी)असे असून मृत पित्याचे नाव शिवलाल साजिव डिगरसे (७०) असे आहे. शिवलाल साजिव डिगरसे हे पिंपरी येथे पत्नी आणि लहान मुलासोबत राहात होते. आरोपी दिनेश हा त्याच्या पत्नीसोबत गावातच वेगळा राहतो. मृत शिवलाल यांना मध्यप्रदेशात दीड एकर शेत मिळाले होते. हे शेत विकून त्या पैशात ट्रॅक्टर घेऊन देण्याचा तगादा दिनेश याने वडिलांकडे लावला होता. परंतुु वडील त्याला दाद देत नव्हते. १६ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास आरोपीची आई, लहान भाऊ आणि पत्नी शेतात गेल्याचे पाहून आरोपीने वडिल शिवलाल यांचेकडे पुन्हा ट्रॅक्टर घेऊन देण्याची मागणी केली. परंतु मुलाची मागणी शिवलाल यांनी धुडकावली. यावरुन संतप्त झालेल्या दिनेशने वडील शिवलाल यांना खाटेच्या लाकडी ठाव्याने बेदम मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले. अंतर्गत रक्तस्त्रावाने त्यांची प्रकृती खालावली. त्यांना त्याच अवस्थेत सोडून तो तेथून निघून गेला. सायंकाळी शिवलालची पत्नी आणि लहान मुलगा घरी आल्यावर त्यांना शिवलाल गंभीर अवस्थेत आढळून आले. त्यांना तत्काळ अंबाडा येथील आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तथापि प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना मोर्शीला नेण्याचा तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. परंतु वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १७ डिसेंबरला मृत शिवलाल यांच्या अंतिम संस्काराची तयारी सुरु झाली. त्यात आरोपी दिनेश सुध्दा सहभागी होता. मात्र, दरम्यान अज्ञात व्यक्तीने मोर्शी पोलिसांना घटनेची माहिती देऊन शिवलाल यांच्या मृत्युबाबत संशय वर्तविला. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार देशमुख यांनी सहायक पोलीस उपनिरीक्षक विनोद कडू यांना घटनास्थळी पाठविले. कडू यांना मृताच्या अंगावर मारहाणीचे वळ दिसून आले. त्यांनी अंतिम संस्कारापूर्वी मृताचे शवविच्छेदन करण्याचा सल्ला कुटुंबीयांना दिला. येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर खूनाचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर मोर्शी पोलिसांनी हत्त्येचा गुन्हा दाखल करुन आरोपीस अटक केली. (तालुका प्रतिनिधी)