शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

चांदूरच्या बाजार समितीचे सभापतिपद सहकार गटाकडे

By admin | Updated: October 14, 2015 00:26 IST

चांदूरबाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदासाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीत दोन्ही पदावर सहकार गटाचे उमेदवार विजयी झाले.

प्रहारला हादरा : सभापतिपदी नंदकिशोर वासनकर, उपसभापती अरविंद लंगोटेचांदूरबाजार : चांदूरबाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदासाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीत दोन्ही पदावर सहकार गटाचे उमेदवार विजयी झाले. विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये सभापतिपदासाठी नंदकिशोर वासनकर तर उपसभापतिपदी अरविंद लंगोटे यांचा समावेश आहे. या निवडणुकीत प्रहारनेही दोन्ही पदासाठी आपले उमेदवार मैदानात उतरविले होते. परंतु त्यांचे संख्याबळ कमी असल्यामुळे प्रहारच्या उमेदवारांना पराभवास सामोरे जावे लागले.बाजार समितीच्या कार्यालयात दोन्ही गटाकडून सभापती व उपसभापतिपदासाठी दुपारी १२.३० ते १ यादरम्यान अनुक्रमे सभापती पदासाठी नंदकिशोर वासनकर व विनोद जवंजाळ यांनी नामांकन अर्ज दाखल केला. उपसभापतिपदासाठी अरविंद लंगोटे व सुभाष मेश्राम यांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. दोन्ही गटाकडून अर्ज दाखल झाल्यामुळे या निवडणुकीसाठी गुप्त मतदान घ्यावे लागले. मतदानानंतर झालेल्या मतमोजणीत सभापतीपदी वासनकर यांना १४ मते मिळाली तर प्रहारच्या विनोद जवंजाळ यांना ४ मते मिळाली. तसेच उपसभापतीपदी सहकार गटाचे अरविंद लंगाटे यांना १३ मते पडली. सुभाष मेश्राम यांना ५ मते मिळाली. निवडणुकीचे काम निर्णय अधिकारी किशोर बलिंगे यांनी पाहिले. (तालुका प्रतिनिधी)प्रहारचे एक मत फुटल्याची चर्चासभापतिपदासाठी झालेल्या मतदानात सहकारचे १३ व प्रहारचे ५ सदस्य असताना निवडून आलेल्या नंदकुमार वासनकर यांना एकमत जास्त मिळाले. फुटलेले हे मत प्रहारचे असल्यामुळे निकाल घोषित होताच चर्चेला उधाण आले होते.बाजार समिती अंतर्गत येणारे शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न मार्गी लावणे हा एकमेव ध्यास माझा व माझ्या सर्व संचालकांचा असेल. बाजार समितीचा विकास व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यास आमचे सदैव प्राधान्य राहणार आहे.- नंंदकिशोर वासनकर, सभापती, बाजारसमिती