शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसमोर ‘सुवर्णमध्य’ साधण्याचे आव्हान

By admin | Updated: March 8, 2016 00:12 IST

अमरावती महापालिकेची तिजोरी कुणी सांभाळायची, कुठल्या गटाचे नेतृत्व मानणाऱ्यांनी स्वीकारावी, यासाठी मोठा गहजब माजला आहे.

स्थायी समितीचा वाद : खोडके-शेखावतांशी आज चर्चा ?अमरावती : अमरावती महापालिकेची तिजोरी कुणी सांभाळायची, कुठल्या गटाचे नेतृत्व मानणाऱ्यांनी स्वीकारावी, यासाठी मोठा गहजब माजला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्यासमोरही खोडके की शेखावत, हा प्रश्न निर्माण झाला आहे. उभय नेत्यांना सर्वमान्य होईल, असा पर्याय देऊन या वादंगातून सुवर्णमध्य साधण्याचे आव्हान त्यांना पेलावे लागणार आहे. मंगळवार ८ मार्च रोजी या वादावर चर्चा करण्यासाठी प्रदेशाध्यक्षांनी खोडके व रावसाहेब शेखावत यांना मुंबईला बोलावले असल्याची माहिती आहे. विलास इंगोले यांचा कार्यकाळ संपुष्ठात आल्यावर स्थायी समितीचा पुढील सभापती कुणाचा? ही शेखावत-खोडकेंसाठी प्रतिष्ठेची लढाई ठरली आहे. शेखावत तर करार मानायलाच तयार नाही. खोडके आता काँग्रेसचे नेते असल्याने चार वर्षांपूर्वी झालेला तो करार आताच्या परिस्थितीत निरर्थक असल्याची सबब शेखावत देतात. नेता म्हणून पक्षबदल झाला असेल, तरी राकॉंफ्रंटचे स्वतंत्र अस्तित्व अबाधित असल्याचा दावा खोडके गटाकडून केला जातो. दावे-प्रतिदावे सुरू असताना शेखावतांनी हा मुद्दा थेट प्रदेशाध्यक्षांच्या दालनात पोहोचविला आहे. शेखावत बॅकफुटवर यायला तयार नाहीत तर दुसरीकडे फ्रंटफुटवर खेळण्याचा दीर्घानुभव असलेल्या खोडकेंनी करार पाळण्याचा आग्रह धरला आहे. जुळवाजुळवीची चाचपणी१६ सदस्यीय सभागृहात स्थायी समिती सभापतीपद मिळविण्यासाठी ९ सदस्यांची गरज आहे. कॉंग्रेस आणि राकॉंफ्रंटमध्ये एकमत झाल्यास सभापतीपदाची निवड अविरोध होऊ शकते. तूर्तास उभय पक्षातील सुंदोपसुंदी पाहता तसे शक्य दिसत नाही. स्थायीमधील कुठला सदस्य आपल्या तंबूत येऊ शकतो, याची युध्दस्तरावर चाचपणी सुरू आहे. तिजोरीची चावी आपल्याकडेच रहावी, यासाठी हा सर्व अट्टाहास सुरू आहे. (प्रतिनिधी)उभय सत्ताकेंद्रातून सरशी कुणाची ?अमरावती काँग्रेसमध्ये अलिकडे दोन सत्ताकेंद्र झाली आहेत. त्यामुळे ८ मार्चला होणाऱ्या संभाव्य बैठकीत खा. चव्हाण काय निर्णय देतात, तो निर्णय उभय नेत्यांना मान्य होणारा राहिल का? याकडे समस्त नगरसेवकांसह राजकीय धुरिणांचे लक्ष लागले आहे. सभापतीपदावर कॉंग्रेसचे आसिफ तवक्कल की राकॉफ्रंटचा चेहरा? यावर उभय नेत्यांचे प्रादेशिक स्तरावर असलेले ‘वजन’ अमरावतीकरांना ज्ञात होणार आहे.वडेट्टीवार बुधवारी शहरातप्रदेशाध्यक्षांनी स्थायी समिती सभापतीपदावर तोडगा काढण्यासाठी निरीक्षक म्हणून आ. विजय वडेट्टीवार यांच्याकडे धुरा दिली आहे. १० मार्चला स्थायी समिती सभापतीची निवड होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार ९ मार्चला शहरात दाखल होणार असल्याची माहिती कॉंग्रेसच्या स्थानिक सूत्रांनी दिली आहे. अशी होईल निवडणूक१० फेब्रुवारीला सकाळी ११ वा. महापालिकेतील सुदामकाका देशमुख सभागृहात ही निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तत्पूर्वी सकाळी ८.३० ते १०.३० पर्यत नामांकन पत्र दाखल करता येणार आहे. त्यानंतर गरज पडल्यास ११ वाजतानंतर निवडणूक होईल.