शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

रेती वाहतूकदारांचा चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 05:00 IST

मध्य प्रदेशातून रॉयल्टी देऊन महाराष्ट्रात रेतीची डंपरद्वारे वाहतूक केली जात आहे. या व्यवसायात हजारो लोकांच्या हाताला काम मिळाले. परंतु, ओव्हरलोड रेती वाहतूक करणाºयांवर महसूल आणि पोलीस प्रशासनाने कारवाईचा धडाका लावत वरूड आणि मोर्शी तालुक्यात रेती वाहतूक बंद केली. हा अन्याय वरूड-मोर्शीतच का, असा सवाल रेती वाहतूकदारांचा आहे.

ठळक मुद्देवरूडात ६५ डंपर रस्त्यावर : महसूल, पोलिसांच्या अरेरावीचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : पोलीस आणि महसूल प्रशासन यांच्याकडून मध्यप्रदेशातून होणाऱ्या रेती वाहतुकीच्या ओव्हरलोड डंपरवर कारवाई रोख असल्याने रेती वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याचा आरोप करून रेती वाहतूकदार संघटना आणि वीर शहीद भगतसिंग सेनेच्यावतीने सोमवारी सकाळी ११ वाजता स्थानिक पांढुर्णा चौकात चक्कजाम आंदोलन केले. यावेळी तब्बल ६५ डंपर रस्त्यावर एका रांगेत लावण्यात आले. बैठ्या संत्याग्रहामुळे एक तास वाहतूक खोळंबली. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. पोलिसांनी १८ कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे नोंदवून अटक आणि सुटका केली.मध्य प्रदेशातून रॉयल्टी देऊन महाराष्ट्रात रेतीची डंपरद्वारे वाहतूक केली जात आहे. या व्यवसायात हजारो लोकांच्या हाताला काम मिळाले. परंतु, ओव्हरलोड रेती वाहतूक करणाºयांवर महसूल आणि पोलीस प्रशासनाने कारवाईचा धडाका लावत वरूड आणि मोर्शी तालुक्यात रेती वाहतूक बंद केली. हा अन्याय वरूड-मोर्शीतच का, असा सवाल रेती वाहतूकदारांचा आहे. प्रशासनाच्या धडक कारवाईने त्रस्त झालेल्या रेती वाहतूकदार संघटना आणि वीर शहीद भगतसिंग सेनेने अखेर स्थानिक पांढुर्णा चौकात ६५ डंपर रस्त्यावर उभे करून बैठे आंदोलन करण्यात आले. यावेळी रेती वाहतूकदार संघटनेच्या पदाधिकाºयांनी उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फडतरे, तहसीलदार सुनील सावंत, ठाणेदार मगन मेहते यांच्यापुढे मागण्या मांडल्या. यावेळी आमदार देवेंद्र भुयार, पंचायत समितीचे सभापती विक्रम ठाकरे, वीर भगतसिंग सेनेचे अध्यक्ष जयंत कोहळे, रवि पुरी आदींनी रेती वाहतूकदारांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली. पोलिसांनी १८ जणांना ताब्यात घेतले. गुन्हे नोंदवून सुटका करण्यात आली.अटी-शर्तीवरच वाहतुकीला परवानगीआंदोलन चिघळू नये, यासाठी रेती वाहतूकदारांशी तहसीलदार सुनील सावंत यांनी बोलणी केली. शासनाच्या अटी व शर्तींना अधीन राहून वाहतूक करता येईल; नियमबाह्य रेती वाहतूक केल्यास कारवाई केली जाईल, असे तहसीलदार सावंत यांनी सांगितले.

 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी