नगरपंचायतच्या सीओंची खुर्ची टांगली झाडाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 05:00 AM2019-11-12T05:00:00+5:302019-11-12T05:01:08+5:30

बाजार ओळ व जुन्या नगरपंचायत कार्यालय परिसरात पदपथावर व्यवसायाची मुभा देण्याची व्यावसायिकांची मागणी होती. मात्र सदर रस्ता हा रहदारीचा असल्याने नगरपंचायत प्रशासनाने विरोध केला होता. मात्र भाजप शहराध्यक्ष अमित बाभूळकर यांनी आक्रमक पवित्रा घेत शेकडो कार्यकर्त्यांसमवेत नगरपंचायत कार्यालयात धाव घेत मुख्याधिकारी सुमेध अलोने यांच्या कक्षात शिरले मात्र मुख्याधिकारी रजेवर असल्याने कार्यकर्त्यांनी त्यांची खुर्ची कार्यालयाबाहेर काढली.

The chair of the municipality was hanged tree | नगरपंचायतच्या सीओंची खुर्ची टांगली झाडाला

नगरपंचायतच्या सीओंची खुर्ची टांगली झाडाला

Next
ठळक मुद्देभाजपचे आंदोलन : प्रशासनावर नाकर्तेपणाचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : नगरपंचायतचे मुख्याधिकारी गैरहजर असल्याने निवेदन देण्यासाठी आलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी सुमेध अलोने यांची खुर्ची त्यांच्या कक्षातून बाहेर काढून झाडाला टांगली. सोमवारी दुपारी हे आंदोलन करण्यात आले.
बाजार ओळ व जुन्या नगरपंचायत कार्यालय परिसरात पदपथावर व्यवसायाची मुभा देण्याची व्यावसायिकांची मागणी होती. मात्र सदर रस्ता हा रहदारीचा असल्याने नगरपंचायत प्रशासनाने विरोध केला होता. मात्र भाजप शहराध्यक्ष अमित बाभूळकर यांनी आक्रमक पवित्रा घेत शेकडो कार्यकर्त्यांसमवेत नगरपंचायत कार्यालयात धाव घेत मुख्याधिकारी सुमेध अलोने यांच्या कक्षात शिरले मात्र मुख्याधिकारी रजेवर असल्याने कार्यकर्त्यांनी त्यांची खुर्ची कार्यालयाबाहेर काढली. ती खुर्ची नगरपंचायत कार्यालयाबाहेर असलेल्या झाडाला लटकवून प्रशासनाचा निषेध केला. ही माहिती मिळताच पोलिसांनी नगरपंचायतीत धाव घेतली. या प्रकरणी भाजपा शहराध्यक्ष अमित बाभूळकर यांच्या सह इतर कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Web Title: The chair of the municipality was hanged tree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.