शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील आरोपी निदा खानचा अटकेनंतर पहिला फोटो समोर; ४ नातेवाईकांसोबत फ्लॅटवर राहत होती...
2
Maharashtra SSC Result 2026: आज दहावीचा निकाल कसा अन् कुठे पाहणार?; 'अशी' सोपी ट्रिक फॉलो करा
3
चार कागदपत्रे नसतील तर महाराष्ट्रात राहता येणार नाही; व्हायरल पोस्टनंतर सरकारने सांगितलं सत्य 
4
चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान
5
MS Dhoni: बिहार- झारखंडमध्ये २० हजार कोटी रुपयांची करवसुली; धोनी ठरला सर्वाधिक कर भरणारा व्यक्ती
6
ज्या सरकारी बँकेत ₹६५ साठी केलेलं साफसफाईचं काम आज त्याच बँकेत बनल्या AGM; कोण आहेत प्रतीक्षा तोंडवलकर?
7
'धुरंधर २' च्या OTT रिलीजची तारीख कन्फर्म? कोर्टातील सुनावणीवेळी निर्मात्यांनी केला खुलासा
8
कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय?
9
होर्मुझजवळ चीनच्या तेल टँकरवर मोठा हल्ला; अमेरिका-इराण युद्धात पहिल्यांदा असं घडलं, तणाव वाढला!
10
Nashik TCS Case: निदा खान कुठं अन् कुणासोबत होती? पोलिसांनी तिला कसं शोधलं? जाणून घ्या A टू Z माहिती
11
Robot World Record : माणसालाही हरवलं! रोबोटनं धावण्याच्या शर्यतीत मोडला जागतिक विक्रम; पाहा थरारक वेग
12
महाराष्ट्रातले साडेतीन पक्ष भाजपपुढे टिकाव धरतील?
13
आजचे राशीभविष्य, ०८ मे २०२६: मेष राशीला व्यवसायात लाभ, 'या' लोकांनी नकारात्मक विचारांपासून दूर राहावे!
14
Eknath Shinde Helicopter : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर वादळामुळे भरकटले; पायलटने प्रसंगावधान राखत केले यशस्वी लँडिंग
15
Hantavirus Outbreak : जगावर नवं संकट! 'हंटा व्हायरस'चा भीषण उद्रेक; जहाजावरील प्रवाशांचे पलायन, आता संसर्गाचा मोठा धोका
16
Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त
17
JNPA Port : ‘जेएनपीए’ पुन्हा ‘हाऊसफुल्ल’; पाचही टर्मिनल्समध्ये लगबग; पश्चिम आशियातील युद्धाचे ढग सरले; २२ हजार कंटेनरची हाताळणी
18
पार्किंगचा दर ऐकून गाडी घरीच ठेवाल! ४० टक्के दरवाढीचा झटका; सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नवे दर लागू
19
लोणावळ्यात धक्कादायक घटना! जन्मदात्या पित्याकडून लेकीवर अत्याचार, दीड वर्षानंतर गुन्हा दाखल
20
विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे?
Daily Top 2Weekly Top 5

सीईओंचा ई-मेल हॅक, अभियंत्याला ७६ हजारांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 05:00 IST

ओमप्रकाश ठाकरे हा तरुण हैद्राबाद येथील कंपनीत कार्यरत आहे. मात्र, एक वर्षापासून त्याचे ‘वर्क फ्राॅम होम’ सुरू आहे. १८ ऑगस्ट रोजी ओमप्रकाशला कंपनीचे सीईओ वासू सत्यपल्ली यांच्या नावाने त्यांच्याच ई-मेलवरून एक ईमेल आला. ७६ हजार २०० रुपये कंपनीच्या व्हेंडरला भरायची आहे,  असे त्यात नमूद होते. तो ईमेल कंपनीच्या सीईओंचा असल्याचे समजून ओमप्रकाशने फोन-पेवरून ३१ हजार १०० व ४५ हजार १०० रुपये हुबळी (कर्नाटक) येथील खात्यावर पाठविले.

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पाठविलेला मेल कंपनीच्या सीईओंचा असल्याचे भासवून त्या कंपनीत काम करणाऱ्या अभियंता तरुणाला ७६ हजार २०० रुपयांचा ऑनलाईन गंडा घालण्यात आला. १८ ऑगस्ट रोजी रात्री ७.३८ ते ९ या कालावधीत ही घटना घडली. याप्रकरणी ओमप्रकाश रामदास ठाकरे (२५, रा. जवळापूर, ता. अचलपूर) यांच्या तक्रारीवरून पथ्रोट पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
ओमप्रकाश ठाकरे हा तरुण हैद्राबाद येथील कंपनीत कार्यरत आहे. मात्र, एक वर्षापासून त्याचे ‘वर्क फ्राॅम होम’ सुरू आहे. १८ ऑगस्ट रोजी ओमप्रकाशला कंपनीचे सीईओ वासू सत्यपल्ली यांच्या नावाने त्यांच्याच ई-मेलवरून एक ईमेल आला. ७६ हजार २०० रुपये कंपनीच्या व्हेंडरला भरायची आहे,  असे त्यात नमूद होते. तो ईमेल कंपनीच्या सीईओंचा असल्याचे समजून ओमप्रकाशने फोन-पेवरून ३१ हजार १०० व ४५ हजार १०० रुपये हुबळी (कर्नाटक) येथील खात्यावर पाठविले. रक्कम पाठविल्याची माहिती त्याने सीईओंसह व्हॉटस्ॲप ग्रुपवर शेअर केली. त्यावेळी कंपनीच्या सीईओंकडून असा कुठलाही इमेल पाठविण्यात आला नाही, असे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. ग्रुपवर खातरजमा केल्यानंतर ही फसवणूक उघड झाल्याची माहिती पथ्रोटचे ठाणेदार सचिन जाधव यांनी ‘लोकमत’ला दिली. 

केवायसी अपडेशन, क्यूआर कोड स्कॅन करायला लावून ऑनलाईन गंडा घातल्याच्या घटना अलीकडे वाढल्या आहेत. मोबाईलधारकाने एनी डेस्क,  टीम व्यूव्हर हे अप्लिकेशन डाऊनलोड करू नये. ओटीपी, एटीएम कार्डचा क्रमांक, पिन कुणाशीही शेअर करू नका.
- सीमा दाताळकर
पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे

केवायसीच्या नावावर १.३९ लाखांचा गंडा 
वलगाव रोडवरील पॅराडाईज काॅलनीत राहणाऱ्या वहीद खुशमुद अली यांना सिमकार्ड केवायसी व्हेरिफिकेशन पेंडिंग असल्याची बतावणी करण्यात आली. मॅसेज पाठवून टीम व्यूव्हर हा ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यामाध्यमातून त्यांच्या खात्याची सर्व माहिती मिळवून खात्यातून चक्क १ लाख ३९ हजार १० रुपये परस्पर विड्रॉल करण्यात आले. २१ ऑगस्ट रोजी दुपारी ३.११  ते ४.२० या एक तासाच्या कालावधीत ही फसवणूक झाली. सायबर पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला. 

 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमfraudधोकेबाजी