शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचपदासाठी उमेदवारांची पळवापळवी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:15 IST

पान २ ची बॉटम चांदूर बाजार : तालुक्यातील सार्वत्रिक निवडणूक झालेल्या ४१ ग्रामपंचायतींमधील सरपंचपदाचे आरक्षण २ फेब्रुवारी रोजी काढण्यात ...

पान २ ची बॉटम

चांदूर बाजार : तालुक्यातील सार्वत्रिक निवडणूक झालेल्या ४१ ग्रामपंचायतींमधील सरपंचपदाचे आरक्षण २ फेब्रुवारी रोजी काढण्यात आले. त्यानंतर सरपंच व उपसरपंच निवडीसाठी ११ ते १६ फेब्रुवारी रोजी दरम्यान ग्रामपंचायतनिहात विशेष सभा घेण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने गावातील राजकारण तापले आहे. ज्या ग्रामपंचायतींमध्ये कुण्या एका पॅनेलला बहुमत मिळाले, तेथे त्यांच्याकडे आरक्षित संवर्गाचा सदस्य असल्यास सरपंचपदाची निवड विनासायास होईल. मात्र, ज्या ठिकाणी कुण्या एका गटाला स्पष्ट बहुमत नाही, तेथे सरपंच आरक्षण असलेल्या संवर्गातील सदस्याला आपल्याकडे खेचण्याचे मोठे प्रयत्न सुरू आहेत.

सरपंचपदासाठी उमेदवारांची पळवापळवी सुरू असल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे. याकरिता सदस्यांना प्रलोभने, आश्वासनाची खैरात वाटली जात आहे. चांदूर बाजार तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक नुकतीच शांततेत पार पडली. प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे कुठेच अनुचित प्रकार घडला नाही. तर नुकतीच आरक्षण सोडत संपन्न झाली असून अनेक गावपुढाऱ्यांनी सत्तास्थापनेसाठी कंबर कसली आहे. आरक्षण सोडतीनंतर चित्र स्पष्ट झाले. सत्तास्थापनेसाठी सदस्यांची पळवापळवी सुरू झाली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

या आठवड्यात तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदाची निवड होईल. यामुळे अनेक ठिकाणी मोचेर्बांधणी सुरू असून 'काही तळ्यात काही मळ्यात' असे चित्र तालुक्यातील ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे. काही ठिकाणी उमेदवार अनेकांना भूलथापा देत असल्याने त्यांना पर्यटनस्थळी पाठवून सुरक्षित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सत्तासपनेसाठी अनेक नवख्या सदस्यांची सध्या मेजवानी सुरू झाली आहे.

रिमोटसाठी प्रयत्न

अनेक ठिकाणी पॅनेलप्रमुखांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, तरिही सत्तेचा रिमोट आपल्याच हाती असावा, यासाठी पॅनेलप्रमुख व गावपुढाºयांनी ‘सरपंचपदाचा सदस्य आणतोच’ अशी शेखी मिरवणी सुरू केले आहे. निवडून आलेल्या अनेक सदस्यांना गावपुढारी व राजकीय नेतेमंडळीतर्फे पैसे व रोजगाराचे प्रलोभने दिली जात आहेत. तर काहींना पदाचे आश्वासने सुद्धा दिली जात आहे.