शहरं
Join us  
Trending Stories
1
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
2
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
3
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
4
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
5
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
6
सामान्यांचा खिसा आणखी रिकामा; महागाईचा ४२ महिन्यांचा उच्चांक; महागाईत सर्वाधिक तीव्र वाढ
7
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
9
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
10
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
11
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
12
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
13
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
14
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
15
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
16
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
17
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
18
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
19
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
20
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
Daily Top 2Weekly Top 5

हत्या करून कडब्याच्या गंजीत मृतदेह जाळला

By admin | Updated: December 11, 2014 22:58 IST

शेतातील झोपडीतच चौकीदाराची निर्घृण हत्या करून मृतदेह कडब्याच्या गंजीत जाळण्यात आला. ही घटना गुरूवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. अशोक खैरे (५०,रा. वरूड, आठवडी बाजार)

वरूड : शेतातील झोपडीतच चौकीदाराची निर्घृण हत्या करून मृतदेह कडब्याच्या गंजीत जाळण्यात आला. ही घटना गुरूवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. अशोक खैरे (५०,रा. वरूड, आठवडी बाजार) असे हत्या झालेल्या व्यक्तिचे नाव आहे.
विस्तृत माहितीनुसार, शहराला लागून निर्मल यावलकर यांचे शेत आहे. या शेतातील झोपडीत अशोक खैरे राहत होता. गुरूवारी नेहमीप्रमाणे कापूस वेचण्यासाठी मजूर महिला शेतात गेल्या असता त्यांना कडब्याच्या गंजीत अर्धवट जळालेल्या अवस्थेत इसमाचा मृतदेह आढळून आला. घाबरलेल्या या महिलांनी त्वरित शेतमालकाला माहिती दिली. शेतमालकाने पोलिसांना पाचारण केले. ठाणेदार अर्जुन ठोसरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता अशोक राहत असलेल्या झोपडीत रक्ताचा सडा पडलेला आढळून आला. अशोक खैरे याच्या डोक्यावर वार करून त्याचा खून करण्यात आला व नंतर फरफटत नेऊन मृतदेह झोपडीपासून ३० फूट अंतरावरील कडब्याच्या गंजीत टाकून जाळण्यात आल्याचा अंदाज आहे.
खुनाचे गूढ कायम
मृत अशोक याला दारूचे व्यसन होते. तो गेल्या अनेक दिवसांपासून या शेतातील झोपडीत एकटाच राहून चौकीदारी करीत होता. अशोकचा खून कशासाठी व कोणी केला याचा तपास पोलीस करीत आहेत.
घटनास्थळाला डीवायएसपी नंदकिशोर शेळके यांनी भेट दिली. तसेच न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे पथक, श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय सातरकर, अरूण मेटे, संदीप लेकुरवाळे, शकील चव्हाण, प्रवीण भाकरे, वरूड पोलीस ठाण्याचे शेवतकर, पावडे, दिवाकर वाघमारे, उमेश निंभोरकर, भीमसिंग आदी पुढील तपास करीत आहेत. वरूड पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूध्द भादंविच्या कलम ३०२, २०१ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. (तालुका प्रतिनिधी)