नित्यानंद कॉलनीत घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:15 IST2021-02-25T04:15:12+5:302021-02-25T04:15:12+5:30

अमरावती : गाडगेनगर ठाणे हद्दीतील नित्यानंद कॉलनीत अज्ञात आरोपीनेे घरफोडी करून घरातील सोन्याच्या दागिन्यांसह इतर साहित्य असा एकूण ४१ ...

Burglary in Nityanand Colony | नित्यानंद कॉलनीत घरफोडी

नित्यानंद कॉलनीत घरफोडी

अमरावती : गाडगेनगर ठाणे हद्दीतील नित्यानंद कॉलनीत अज्ञात आरोपीनेे घरफोडी करून घरातील सोन्याच्या दागिन्यांसह इतर साहित्य असा एकूण ४१ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना १६ फेब्रुवारी रोजी घडली. या प्रकरणी पोलिसांनी मंगळवारी (दि. २३) गुन्हा नोंदविला.

एका महिलेच्या तक्रारीवरून पोलिसानी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंविची कलमे ४५७, ४५४, ३८० अन्वये गुन्हा नोंदविला आहे. फिर्यादी महिला १६ फेब्रुवारी रोजी रात्री घराला कुलूप लावून गावी गेल्या होत्या. मंगळवारी त्या परत आल्यानंतर त्यांना घराचा कुलूपकोयंडा तुटलेला दिसला. त्यांनी कपाटाची पाहणी केली असता, घरातील साहित्य अस्ताव्यस्त दिसले. तसेच कपाटातील नगदी १० हजार, सोन्याचे कानांतील, तसेच इतर दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी पोलिसांत येऊन तक्रार नोंदविली. पुढील तपास पीएसआय आर. आर. जढाळे करीत आहेत.

Web Title: Burglary in Nityanand Colony