शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

संक्षिप्त बातमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:33 IST

भातकुली : शहरातील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक उर्दू शाळेत नगरसेवक अब्दुल शफीक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ...

भातकुली : शहरातील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक उर्दू शाळेत नगरसेवक अब्दुल शफीक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. -------------

कळमखार येथून दुचाकी लंपास

धारणी : तालुक्यातील कळमखार येथून एमएच २७ सीआर ५४७७ क्रमांकाची दुचाकी लंपास करण्यात आली. २५ जानेवारीच्या रात्री ही घटना घडली. रवींद्र रमेशचंद्र राठोड (४९) यांनी याप्रकरणी धारणी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

----------

दिवाणी, फौजदारी न्यायालयात ध्वजारोहण

भातकुली : येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात गणतंत्र दिनी न्यायाधीश ए.आर. टोंगसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी भातकुली पोलिसांनी ध्वजाला सलामी दिली. भातकुली तालुका वकील संघाचे सदस्य व न्यायालयाचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

------------

काणस शिवारातून मोटरपंप लंपास

नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील येणस येथील रहिवासी प्रफुल्ल रामराव रघुते (३२) यांच्यासह शेजारी शेत असलेले यज्ञेश्वर भुरे यांच्या काणस शिवारातील शेतातून मोटरपंप लंपास करण्यात आले. त्यामुळे त्यांचे १४ हजारांचे नुकसान झाले. २४ जानेवारीच्या रात्री हा प्रकार निदर्शनास आला.

------------

इसमाला मारहाण मद्यपीविरुद्ध गुन्हा

नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील शिवणी रसुलापूर येथे क्षुल्लक कारणावरून दारूच्या अंमलाखाली मारहाण करणाऱ्याविरुद्ध नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. १५ जानेवारी रोजी ही घटना घडली होती. पांडू शंकरलाल इंगोले असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध उमेश दिनकरराव जवंजाळ यांनी तक्रार दिली होती.

-----------

मुलीला फूस लावून पळविले

चिखलदरा : तालुक्यातील एका गावातून २० जानेवारी रोजी मुलीला पळवून नेण्यात आल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी झिंगऱ्या बिसराम भुसुम (४५) याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

------------

वीजप्रवाहाने म्हशीचा मृत्यू

परतवाडा : मुगलाईपुरा येथील धरमू धोटेकर यांच्या धर्मकाट्याजवळील शेतात वीजप्रवाहाने मृत्यू झालेल्या स्थितीत सैयद तैयब अली (४५, रा. गुलजार कॉलनी) यांची म्हैस आढळून आली. ती १८ जानेवारी रोजी खुंटावरून सुटून पळाली होती. तक्रारीवरून परतवाडा पोलिसांनी धरमू धोटेकरविरुद्ध भादंविचे कलम ४२९ अन्वये गुन्हा नोंदविला.

-----

निमखेडबाजार येथे विवाहितेचा छळ

अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील निमखेडबाजार येथील विवाहितेने पती मोहम्मद अली मोहम्मद शफीक, शेख जफर व चार महिलांविरुद्ध माहेरहून पैसे आणण्यासाठी छळ केला जात असल्याची तक्रार अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी भादंविचे कलम ४९८, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.

------------