शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये निकाल लागल्यानंतर सुरू झालेला हिंसाचार थांबेना, जमावाने लेलिनचा पुतळा तोडला, भाजपावर आरोप
3
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
4
क्रूरतेचा कळस! सरकारी नोकरीसाठी बायकोनेच केला नवऱ्याचा 'गेम'; दिली १ लाखाची सुपारी
5
NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
6
शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्र अन् मनसेनं केला विरोध
7
Rohit Pawar : "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले
8
संजू सॅमसनची फलंदाजी 'सुपरहिट'; पण शरीराचा आकार पाहून दिग्गज म्हणाला- ही तर चिंतेची बाब!
9
Astro Tips: शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते तेव्हा मिळतात 'हे' संकेत; तुम्ही अनुभवलेत का?
10
‘एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार’, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा  
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
12
'जमील जमाली'चा नोरा फतेहीसोबत डान्स, राकेश बेदींनी शेअर केला बीटीएस व्हिडीओ
13
‘या‘ निकषांमध्ये फिट बसणार, त्यालाच बंगालचा मुख्यमंत्री बनवणार, अमित शाहांनी आधीच दिले होते संकेत 
14
Vi Share Price Today: व्होडाफोन आयडियाच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये मोठे बदल; कुमार मंगलम बिर्लांकडे आता 'ही' जबाबदारी, शेअर सुस्साट
15
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
16
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
17
"...तर भाजपाला आज लोकसभेच्या १४० जागाही जिंकता येणार नाही", राहुल गांधी केंद्र सरकारवर संतापले
18
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
19
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
20
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
Daily Top 2Weekly Top 5

दोन ठिकाणी तोडला सहाव्यांदा पूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 06:00 IST

रात्री १ वाजता मोठ्या प्रमाणात पाणी शिरू लागल्याने सरपंच व सदस्यांनी वॉर्ड २ मधील सर्व नागरिकांना झोपेतून जागे केले. त्यानंतर तात्काळ रस्ता चौपदरीकरण करणाऱ्या एमएसकेएल कंपनीच्या अधिकाऱ्यांना सूचना दिली. त्यांनी सदर पूल सोडण्यास नकार दिला. मात्र, पाण्याचा वाढता प्रवाह आणि नागरिकांच्या दबावामुळे रात्री दीड वाजता पूल तोडण्यात आला.

ठळक मुद्देसावळी दातुरा येथे ८५ घरांत पाणी : रात्री १ वाजता केले ग्रामस्थांना सजग

परतवाडा : सपन प्रकल्पाचे दरवाजे २० सेंटिमीटरने उघडल्याने नदीचा प्रवाह वाढून गुरुवारी रात्री १ वाजताच्या सुमारास सावळी दातुरा येथील वॉर्ड २ मधील ८५ घरांमध्ये पाणी शिरले. पाण्याचा वेगवान प्रवाह पाहता, सरपंच व सदस्यांनी नागरिकांना झोपेतून उठविले. परतवाडा-अकोला महामार्गावर तात्पुरता बांधलेला पूल सहाव्यांदा दोन ठिकाणी तोडल्यानंतर प्रवाह काहीसा शांत झाला.चिखलदरा व परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावल्यानंतर गुरुवारी रात्री ११:३० च्या सुमारास सावळी दातुरा परिसरात सपन नदीला पाण्याचा प्रवाह वाढत होता. सरपंच मनोहर बहुराशी, सदस्य राजेश पावडे, सामाजिक कार्यकर्ते प्यारेलाल प्रजापती यांनी विचारणा केली असता, सपन प्रकल्प अधिकारी व प्रशासनाने विसंगत माहिती दिली. रात्री १ वाजता मोठ्या प्रमाणात पाणी शिरू लागल्याने सरपंच व सदस्यांनी वॉर्ड २ मधील सर्व नागरिकांना झोपेतून जागे केले. त्यानंतर तात्काळ रस्ता चौपदरीकरण करणाऱ्या एमएसकेएल कंपनीच्या अधिकाऱ्यांना सूचना दिली. त्यांनी सदर पूल सोडण्यास नकार दिला. मात्र, पाण्याचा वाढता प्रवाह आणि नागरिकांच्या दबावामुळे रात्री दीड वाजता पूल तोडण्यात आला. नदीकाठच्या घरांमध्ये धान्य आणि कपड्यांचे नुकसान झाले.गुरुवारी रात्री पाण्याचा विसर्ग सर्वाधिक होता. त्याची माहिती प्रशासनाने दिली नाही. संबंधित कन्स्ट्रक्शन कंपनीला दोन ठिकाणी पूल तोडण्यास लावले. त्यामुळे अनर्थ टळला.- मनोहर बहुराशी, सरपंच

टॅग्स :floodपूर