शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
3
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
4
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
5
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
6
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
7
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
8
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
9
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
10
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
11
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
12
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
13
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
14
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
15
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
16
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
17
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
18
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
19
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
20
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांना हद्दीचा संभ्रम; तक्रार नंतर, आधी हद्द कुठली ती सांगा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 05:01 IST

हद्द बदल्यास तक्रारकर्त्याला तक्रार नोंदविण्यासाठी दूरचे अंतर गाठावे लागते. एकट्या वरूड तालुक्यात वरूडसह शेंदूरजनाघाट व बेनोडा, चांदूरबाजार तालुक्यात चांदूरबाजारसह शिरजगाव व ब्राह्मणवाडा थडी, भातकुली तालुक्यात भातकुलीसह खोलापूर या ठाण्यांच्या सीमा एकमेकांना लागून आहेत. त्यामुळे अनेक जणांना या पोलीस ठाण्यातून त्या पोलीस ठाण्यात नाहकच येरझारा माराव्या लागतात. प्रत्यक्षात सीआरपीसीच्या कलम १५४ प्रमाणे तक्रारदार ज्या पोलीस ठाण्यात गेला, तेथेच गुन्हा दाखल करणे, बंधनकारक आहे.

प्रदीप भाकरेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सर्वसामान्यांच्या सोयीसाठी त्या त्या भागात एक पोलीस ठाणे आहे. मात्र, तक्रार नोंदवून घेण्याआधी गुन्हा कुणाच्या हद्दीत घडला, नेमका कुठे घडला, याबाबत विचारणा केली जाते. तो गुन्हा दुसऱ्या ठाण्याच्या हद्दीत घडला असल्यास तक्रारदाराला तिकडे पाठविले जाते. शहरातील १० पोलीस ठाण्यांचा परिसर एकमेकांना लागून असल्याने हा संभ्रम निर्माण होतो. मात्र, ग्रामीण भागातील ३१ पोलीस ठाणी दूर अंतरावर आहेत. त्यामुळे हद्द बदल्यास तक्रारकर्त्याला तक्रार नोंदविण्यासाठी दूरचे अंतर गाठावे लागते. एकट्या वरूड तालुक्यात वरूडसह शेंदूरजनाघाट व बेनोडा, चांदूरबाजार तालुक्यात चांदूरबाजारसह शिरजगाव व ब्राह्मणवाडा थडी, भातकुली तालुक्यात भातकुलीसह खोलापूर या ठाण्यांच्या सीमा एकमेकांना लागून आहेत. त्यामुळे अनेक जणांना या पोलीस ठाण्यातून त्या पोलीस ठाण्यात नाहकच येरझारा माराव्या लागतात. प्रत्यक्षात सीआरपीसीच्या कलम १५४ प्रमाणे तक्रारदार ज्या पोलीस ठाण्यात गेला, तेथेच गुन्हा दाखल करणे, बंधनकारक आहे. मात्र, अपवादात्मक स्थितीत काही ठिकाणी तसे होताना दिसत नाही. त्याचा त्रास मात्र पोलीस ठाण्याशी संबंधित कामे घेऊन नागरिकांना सहन करावा लागत आहे.

गावे दुसऱ्याच पोलीस ठाण्यात पूर्वी भातकुली तालुक्यातील अनेक गावे खोलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत समाविष्ट करण्यात आलेली होती. मात्र, पोलीस भातकुली ठाण्याची निर्मिती झाल्यानंतर ती गावे भातकुली पोलीस ठाण्याशी संलग्न करण्यात आली आहे. त्यामुळे आजही अनेक लोक तक्रार देण्याकरिता खोलापूर पोलीस ठाण्यात धाव घेत असल्याचे चित्र आहे.

हद्दीचा संभ्रमअंजनसिंगी हे गाव धामणगाव रेल्वे तालुक्यात आहे. ते गाव तिवसा तालुक्यातील कुर्हा या पोलीस ठाण्याशी संलग्न आहे. त्यामुळे कुर्हा पोलीस ठाण्यात गेल्यास तक्रार नोंदवून घेण्यापूर्वी घटनास्थळाची विचारणा केली जाते.

लगतची तीन गावे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यातभातकुली तालुक्यातील कुंड सर्जापूर, खारतळेगाव व अळणगाव ही तीनही गावे एकमेकांशेजारी आहेत. मात्र, अळणगाव भातकुलीत, कुंड सर्जापर नागपुरीगेटमध्ये तर खारतळेगाव वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. त्यामुळे पोलिसांसोबतच तक्रारकत्यांसमोरदेखील हद्दीचा प्रश्न निर्माण होतो. 

 

टॅग्स :Policeपोलिस