शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

एक हजार हेक्टरला बोगस बियाण्यांचा फटका

By admin | Updated: July 29, 2014 23:35 IST

तालुक्यात तळेगाव दशासर परिसरातील तब्बल आठ गावांना सोयाबीनच्या बोगस बियाण्यांचा फटका बसला आहे़ वीस दिवसांत शेतात पेरलेले बियाणे उगविलेच नसल्याने या भागातील शेतकऱ्यांनी कृषी

धामणगाव (रेल्वे) : तालुक्यात तळेगाव दशासर परिसरातील तब्बल आठ गावांना सोयाबीनच्या बोगस बियाण्यांचा फटका बसला आहे़ वीस दिवसांत शेतात पेरलेले बियाणे उगविलेच नसल्याने या भागातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. संबंधित कंपनीविरुध्द फौजदारी कारवाई करण्यासाठी या क्षेत्रातील शेतकऱ्यांनी लोकशाही मार्गाने लढा उभारण्याचा मार्ग पत्करला आहे़धामणगाव तालुक्याला दरवर्षी बोगस बियाण्याचा फटका बसतो. यात सर्वाधिक सोयाबीन बियाणे बोगस निघतात ही वस्तुस्थिती आहे़ मागील वीस दिवसांपूर्वी तळेगाव दशासर परिसरातील वाढोणा, शेंदूरजनाखुर्द, कामनापूर घुसळी, काशीखेड, मलातपूर या भागातील शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी आपल्या शेतात केली, परंतु अद्यापही हे बियाणे निघालेच नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात धक्का बसला आहे़ अनेक शेतकऱ्यांनी उसनवारी, सावकाराचे व बँकेचे कर्ज घेवून आपल्या शेतीची पेरणी केली़ विशेषत: कृषी विभागाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे उगवन क्षमता तपासली तरीही ही बियाणे निघालेच नसल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी दाखल केल्या आहे़ गत दोन दिवसांत कृषी कार्यालयात तब्बल पन्नासच्या जवळपास बोगस बियाण्यांच्या तक्रारी आल्या आहेत़दरवर्षी कागदाचा खेळ मागील वर्षी शिदोडी, चिंचपूर, वरूड बगाजी, ऐरली या भागातील बोगस सोयाबीने बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारले जात असल्याचे उघड झाले होते़ यापरिसरातील शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयापासून तर पुण्याच्या कृषी आयुक्तालया पर्यंत तक्रारी दाखल केलेल्या होत्या.