शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

लोकमतच्यावतीने जिल्ह्यात २ जुलैपासून रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 05:00 IST

स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांची २ जुलै रोजी जयंती आहे. त्याप्रीत्यर्थ अमरावतीसह जिल्ह्यातील सर्व १४ तालुक्यांच्या ठिकाणी नातं रक्ताचं, नातं जिव्हाळ्याचं हा रक्तदान शिबिराचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. २ व ३ जुलै रोजी लोकमत वृत्तपत्र कार्यालय, विभागीय क्रीडा संकुल, मोर्शी रोड, अमरावती येथे सकाळी १० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत या शिबिराचा शुभारंभ आहे.

ठळक मुद्देनातं रक्ताचं, नातं जिव्हाळ्याच, महाशिबिराची अमरावतीहून सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रक्तदान म्हणजे जीवनदान, मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढून निर्बंध लागल्याने राज्यभरात रक्तदानाचे उपक्रम थांबले आहेत. पर्यायाने शस्त्रक्रियांसह अनेक उपचारांमध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत. रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याने 'लोकमत'च्यावतीने जिल्ह्यात २ ते ११ जुलै या कालावधीत सकाळी १० ते ३ या वेळेत महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात जिल्हाभरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांची २ जुलै रोजी जयंती आहे. त्याप्रीत्यर्थ अमरावतीसह जिल्ह्यातील सर्व १४ तालुक्यांच्या ठिकाणी नातं रक्ताचं, नातं जिव्हाळ्याचं हा रक्तदान शिबिराचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. २ व ३ जुलै रोजी लोकमत वृत्तपत्र कार्यालय, विभागीय क्रीडा संकुल, मोर्शी रोड, अमरावती येथे सकाळी १० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत या शिबिराचा शुभारंभ आहे.कोविड संकटाच्या काळात रक्त तुटवड्यामुळे ज्यांना नियमित रक्ताची गरज भासते असे थॅलेसीमिया, सिकलसेल रुग्णांचीही गैरसोय होत आहे. गर्भवती मातांसह अपघातग्रस्तांना आपतकालीन परिस्थितीत रक्ताची गरज भासते. या स्थितीत वेळेत रक्तदाता शोधणे व त्याचा रक्तगट जुळवणे हे अतिशय जिकरीचे काम आहे. या सर्वांना जीवनदान देण्यासाठी खऱ्या दात्यांनी पुढे येण्याची गरज आहे, तरच आपण खऱ्या अर्थाने जीवनदान अर्पण करू शकतो. शासकीय रक्तपेढीत आज रक्ताचा ठणठणाट आहे. त्यामुळे डॉक्टरांना रुग्णांवर उपचार करतानाही अडचणी येत आहे.कोरोना महामारी व लसीकरणामुळे अनेकांना रक्तदानाची इच्छा असूनही मर्यादा आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर 'लोकमत'ने सामाजिक दायित्व म्हणून रक्तदान शिबिरासाठी पुढाकार घेतला आहे. यात आपला सक्रीय सहभाग नोंदवून रक्तदानाची एक लोकचळवळ उभी राहावी, असे आवाहनही करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क ९२७०१३१५८०

यांनी करावे रक्तदान - १८ ते ६० वर्ष वयोगटातील व्यक्ती.- कोविड निगेटिव्ह झाल्यानंतर २८ दिवसाने रक्तदान करता येते.- लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसाने रक्तदान करता येते.- दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवसाने रक्तदान करता येते. 

 

टॅग्स :Blood Bankरक्तपेढी