बाबुजींच्या जयंतीनिमित्त २ जुलै रोजी रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 05:00 IST2020-06-30T05:00:00+5:302020-06-30T05:00:53+5:30

लाईफ लाईन ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकमत’चे संस्थापकीय संपादक तथा ज्येष्ठ स्वातंत्र सेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या जयंतीनिमित्त २ जुलै रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ३ या वेळेत ‘लोकमत’ कार्यालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

Blood donation on 2nd July on the occasion of Babuji's birthday | बाबुजींच्या जयंतीनिमित्त २ जुलै रोजी रक्तदान

बाबुजींच्या जयंतीनिमित्त २ जुलै रोजी रक्तदान

ठळक मुद्दे‘लोकमत’चा सामाजिक उपक्रम : सहभागी होण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लोकमत वृत्तपत्र समूह व नागपूर स्थित लाईफ लाईन ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकमत’चे संस्थापकीय संपादक तथा ज्येष्ठ स्वातंत्र सेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या जयंतीनिमित्त २ जुलै रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ३ या वेळेत ‘लोकमत’ कार्यालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक-युवती, नागरिक, सेवाभावी संस्था, शासकीय-खासगी संस्थांचे कर्मचारी, समाजसेवक, सामाजिक-राजकीय कार्यकर्ता, युवा नेक्स्ट व सखी मंच सदस्य रक्तदान शिबिरात सहभागी होऊ शकतात. प्रत्येक रक्तदात्याला रक्तदाता कार्ड, रक्तदान प्रमाणत्र व आकर्षक गिफ्ट देण्यात येईल. या रक्तदान अभियानात जास्तीत-जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन लोकमत वृत्तपत्र समूहाने केले. अधिक माहितीसाठी लोकमत कार्यालय, विभागीय क्रीडा संकुल, मोर्शी रोड, अमरावती येथे किंवा ९२७०१३१५८०, ८१८००१८१८७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Blood donation on 2nd July on the occasion of Babuji's birthday