शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाने के ली ऐतिहासिक फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 23:27 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकºयांना कर्जमाफी जाहीर करताना 'ऐतिहासिक' या शब्दाचा उल्लेख केला.

ठळक मुद्देराजू शेट्टी : सरकारला विचारणार जाब

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकºयांना कर्जमाफी जाहीर करताना 'ऐतिहासिक' या शब्दाचा उल्लेख केला. यात कर्जमाफी नव्हे, तर शासनाने केलेली फसवणूक ऐतिहासिक आहे, अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी भाजपा-शिवसेना युती सरकारवर ताशेरे ओढले.आपण सरकारला जाब विचारण्यासाठीच येथे आलो असून पुढील आंदोलन कापूस व सोयाबीनसाठी करणार असल्याचे सूतोचाव त्यांनी यावेळी केले. अमरावती जिल्ह्यातील वरूड येथे आयोजित सुकाणू समिती व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या 'शेतकरी एल्गार' मेळाव्यात ते शेतकºयांसमोर भावना व्यक्त करीत होते.यावेळी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, अचलपूर मतदारसंघाचे आ.बच्चू कडू, प्रकाश पोकळे, गजानन अहमदाबादकर, जिल्हाध्यक्ष अमित अढाऊ, वंदना यादव, दया राऊत, देवेंद्र भुयार आदी उपस्थित होते. शेतकरी मेळाव्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.खा.शेट्टी म्हणाले, मला मंत्रिपदाची आॅफर देण्यात आली. मात्र, आधी शेतकºयांचा सातबारा कोरा करा, स्वामिनाथन आयोग लागू करा, या मागण्या मी समोर ठेवल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी उत्पादनावर दीडपट हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते पाळले गेले नाही. ज्या हातांनी सरकारला दिल्लीच्या चाव्या दिल्या तेच हात त्यांना हाकलून लावतील. शासनाने दिवाळीपर्यंत कर्जमाफीचा घोळ सोडवावा, अन्यथा मंत्र्यांना दिवाळी साजरी करू देणार नाही, असा इशारा आ. बच्चू कडू यांनी दिला आहे.शेतकºयांना अटी का?देश सध्या युद्धाच्या सावटाखाली आहे. हे युद्ध भारत-चीन यांच्यात असल्याचा बनाव केला जातो. मात्र प्रत्यक्षात हे युद्ध भारतविरुद्ध इंडिया यांच्यात सुरू आहे. शेतकºयांना अटी लावून कर्ज माफ केले जाते. उद्योगपतींचे कर्ज माफ करण्यासाठी कोणतीही अट लावली जात नाही. शेतकºयांचे गंभीर प्रश्न सोडून सरकार के वळ जातीयवाद पसरविण्याचे काम करीत असल्याचा आरोप मेळाव्यात करण्यात आला.