भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्षाला अटक

By Admin | Updated: August 21, 2014 23:31 IST2014-08-21T23:31:24+5:302014-08-21T23:31:24+5:30

फसवणूक व विश्वासघात प्रकरणी भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्षाला गुरुवारी नाशिक पोलिसांनी अटक केली. तसेच त्याच्या एका साथिदारालाही ताब्यात घेण्यात आले. या कावाईने भाजपात खळबळ उडाली आहे.

BJP's district superintendent of police arrested | भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्षाला अटक

भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्षाला अटक

फसवणूक प्रकरण : नाशिक पोलिसांची कारवाई
अचलपूर : फसवणूक व विश्वासघात प्रकरणी भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्षाला गुरुवारी नाशिक पोलिसांनी अटक केली. तसेच त्याच्या एका साथिदारालाही ताब्यात घेण्यात आले. या कावाईने भाजपात खळबळ उडाली आहे.
निरुळगंगामाई येथील रहिवासी सचिन नामदेव भागवत, असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुध्द नाशिक ग्रामीण पोलिसात भादंविच्या कलम ४२०, ४०६, ४६७ अन्वये गुन्हा दाखल आहे. ंआज गुरुवारी सकाळी नाशिकच्या ग्रामीण विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बि.सी. वाघमारे यांच्या नेतृत्वातील पोलीस पथक आसेगाव पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी आसेगाव पोलिसांच्या मदतीने निरुळ गंगामाई येथून सचिन भागवत व त्याचा साथिदार निखिल सुभाष कळस्कर याला हिंमतपूर वाठोडा येथून ताब्यात घेतले. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सचिन भागवत याने संताजी सेना नावाची संघटना तयार केली होती. या संघटनेचा विस्तार करण्यासाठी मूळचे कापुसतळणी येथील रहिवासी व सध्या संगमनेर, मालेगाव जि. नाशिक येथे प्राध्यापक असलेले किशोर सखाराम चौधरी यांच्या तो संपर्कात आला. चौधरी यांना संताजी सेनेचे नाशिकचे जिल्हाध्यक्ष पद दिले. त्यानंतर नाशिक भागात चौधरी यांच्या नावाचा वापर करुन संघटनेचा विस्तार सुरु केला. यापरिसरात भागवतने संताजी सेनेच्या शाखा उघडल्या. त्यानंतर समाज उत्थानासाठी महत्त्वपूर्ण कार्यक्रम राबविण्याचे सांगून संघटनेच्या प्रत्येक शाखेकडून व जिल्हाध्यक्षकांकडून वर्गणी गोळा करणे सुरु केले. संघटनेचे कार्य अधिक प्रभावशाली होण्यासाठी प्रत्येक जिल्हाध्यक्षांना स्विफ्ट गाडी देण्याची आमिषे दिली.

Web Title: BJP's district superintendent of police arrested