भाजप, बजरंग दलाच्यावतीने चांदूर बाजार पोलीस दलाचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:10 IST2021-07-01T04:10:22+5:302021-07-01T04:10:22+5:30

चांदूर बाजार : जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या दुचाकीचोरांचा पर्दाफाश केल्याबद्दल स्थानिक भाजप व बजरंग दलातर्फे चांदूर बाजार, ब्राह्मणवाडा थडी व ...

BJP, Bajrang Dal felicitate Chandur Bazar Police Force | भाजप, बजरंग दलाच्यावतीने चांदूर बाजार पोलीस दलाचा सत्कार

भाजप, बजरंग दलाच्यावतीने चांदूर बाजार पोलीस दलाचा सत्कार

चांदूर बाजार : जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या दुचाकीचोरांचा पर्दाफाश केल्याबद्दल स्थानिक भाजप व बजरंग दलातर्फे चांदूर बाजार, ब्राह्मणवाडा थडी व शिरजगाव कसबा पोलीस ठाण्यातील पथकांचा स्थानिक पोलीस ठाण्यात सत्कार करण्यात आला.

चांदूर बाजार पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील किनगे, ब्राह्मणवाडा थडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक वळवी, शिरजगाव कसबा पोलीस ठाण्याचे निरीक्षक पंकज दाभाडे यांच्या चमूने महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. तालुक्यातून ५६ दुचाकी ताब्यात घेऊन सहा चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. याप्रसंगी सहायक पोलीस निरीक्षक पेंदोर, पोलीस उपनिरीक्षक प्रतिभा मेश्राम, दिलीप नांदूरकर, विनोद इंगळे, दिलीप मुळे, दत्तात्रेय वानखडे, प्रशांत भटकर, वीरेंद्र अमृतकर, निकेश नशीबकर, महेश काळे आदी उपस्थित होते. दुचाकी न्यायालयाच्या आदेशानंतर मूळ मालकांना परत करणार असल्याची माहिती ठाणेदार सुनील किनगे यांनी यावेळी दिली. भाजपचे नगरसेवक अतुल रघुवंशी, मनोज कटारिया, नगरसेवक आनंद अहिर, सूरज अहिर, मनोज सोळंके, शुभम सपाटे, आशु पाटेकर, अंकुश भुम्बर आदींनी हा सत्कार सोहळा घेतला.

Web Title: BJP, Bajrang Dal felicitate Chandur Bazar Police Force