शहरं
Join us  
Trending Stories
1
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
2
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
3
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
4
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
5
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
6
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
7
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
8
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
9
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
10
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
11
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
12
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
13
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
14
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
15
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
16
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
18
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
19
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
20
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
Daily Top 2Weekly Top 5

अर्थकारणातून अभद्र युतीचा जन्म

By admin | Updated: October 14, 2015 00:15 IST

'माझ्या पाया पडणारे सुनील वऱ्हाडे रविवारी रात्री अचानक बेपत्ता झाले.

संजय बंड यांचा आरोप : 'राणा प्रवृत्ती'चा निषेध, सत्तेसाठी वऱ्हाडे पडले पायाअमरावती : 'माझ्या पाया पडणारे सुनील वऱ्हाडे रविवारी रात्री अचानक बेपत्ता झाले. सहकार पॅनेलला जाऊन मिळाले. राणा-यशोमती ही अभद्र युती जन्माला आली. घोडेबाजाराच्या या 'राणा प्रवृत्ती'चा आम्ही तीव्र निषेध करतो', अशा शब्दांत परिवर्तन पॅनेलचे नेता संजय बंड यांनी सभापती निवडीनंतर लगेचच पत्रपरिषदेत घेऊन संतप्त भूमिका जाहीर केली. यावेळी त्यांनी अनेक खळबळजनक आरोपही केलेत. वऱ्हाडेंना सभापतिपदी विराजमान करणे हा घोडेबाजारात झालेल्या कोट्यवधीच्या उलाढालीचा परिपाक होय, असा थेट आरोपही त्यांनी केला. बाजार समितीवर भगवा फडकू नये, यासाठी राज्यपातळीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती बंड यांनी दिली. न मिळालेले एक मत कुणाचे, याबाबत वऱ्हाडे यांनी संशोधन करावे, असा खोचक सल्लाही त्यांनी दिला. ज्या नवनियुक्त संचालकांनी कोरी मतपत्रिका टाकून तत्त्वांशी तडजोड करणार नसल्याचे दाखवून दिले, त्यांचे नाव कळल्यास त्यांचा सत्कार करु आणि आमच्याशी जुळत असल्यास जुळवून घेऊ, असेही संजय बंड म्हणाले. यावेळी मनोज देशमुख, संतोष इंगोेले, भागवतराव खांडे, आशिष धर्माळे, प्रकाश काळबांडे, श्याम देशमुख, नाना नागमोते, उमेश घुरडे, रंगराव बिचुकले, प्रांजली भालेराव, प्रवीण भुगूल हे सात संचालक उपस्थित होते. राणांना बोलण्याचा अधिकार नाहीज्या रवी राणांनी बीएसएनएलची ३० कोटी रुपयांची जागा हडपली त्यांना आम्हाला खंडणीखोर म्हणण्याचा अधिकार नाही, अशी प्रखर टीका करतानाच सत्तेसाठी पाया पडणारे वऱ्हाडे दगाबाज निघाले, अशी तोफही त्यांनी डागली.परिवर्तन पॅनेलमध्ये ज्येष्ठ असताना आणि याआधी तीनदा बाजार समितीमध्ये प्रतिनिधीत्व केले असतानाही सभापती म्हणून मला डावलण्यात आले. त्यामुळे नाईलाजाने हे पाऊल उचलावे लागले. - सुनील वऱ्हाडे, नवनिर्वाचित सभापती.सहा महिन्यांतच येणार अविश्वासवऱ्हाडेंना सभापतिपदी बसवणे अनेकांना रूचलेले नाही. १८ पैकी एक मत कोरे पडणे, हे त्याचेच द्योतक आहे. त्यांच्या गटात अंतर्गत धुसफूूस आहेच. सहा महिन्यांतच त्यांच्यावर अविश्वास येर्ईल, असा दावा बंड यांनी केला. आम्ही सक्षमपरिवर्तनमधून वऱ्हाडे फुटले असले तरी अन्य ७ संचालक एकत्र आहेत. आम्ही बाजार समितीमध्ये सक्षम विरोधकाची भूमिका वठवू. कुणालाही पैसा खाऊ देणार नाही, असे बंड यांनी ठणकावले. सभापती-उपसभापतिपद अमरावती तालुक्यातील संचालकांना दिले. भरभरुन मते देणाऱ्या भातकुली तालुक्यावर यात अन्याय झाल्याचा आरोपही बंड यांनी केला.