शहरं
Join us  
Trending Stories
1
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
2
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
3
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
4
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
5
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
6
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
7
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
8
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
9
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
10
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
11
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
12
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
15
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
16
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
17
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
18
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
20
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

जैविक-अजैविक कचरा जाळल्याने जीवाला धोका

By admin | Updated: August 24, 2014 23:12 IST

अमरावती नगरपरिषद त्यानंतर महापालिका स्थापनेपासून आजतागायत शहरातून निघणारा जैविक व अजैविक कचरा सुकळी येथील कम्पोस्ट डेपोत साठवून ठेवला जात आहे.

अमरावती : अमरावती नगरपरिषद त्यानंतर महापालिका स्थापनेपासून आजतागायत शहरातून निघणारा जैविक व अजैविक कचरा सुकळी येथील कम्पोस्ट डेपोत साठवून ठेवला जात आहे. या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे अपेक्षित होते. मात्र प्रशासनाला या कामी अपयश आल्याचे दिसून येते. कचरा साठवून राहत असल्याने रोगराई, प्रदूषणाला वाव मिळत असल्याची बाब महाराष्ट्र नियंत्रण महामंडळाने यापूर्वी महापालिकेला पत्र पाठवून अवगत केली आहे. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाळीच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर होऊ नये, अशी नियमावली आहे. मात्र महाराष्ट्र प्लास्टिक कॅरिबॅग उत्पादन आणि वापर नियम २००६ ची अंमलबजावणी प्रशासनाकडून होत नसल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी नंदकिशोर गांधी यांनी केला आहे. कम्पोस्ट डेपोत तयार झालेली कचऱ्याची टेकडी ही धोक्याची घंटा असताना या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट का लावली जात नाही, हा सवाल सर्वसामान्यांचा आहे. यापूर्वी स्पिड कंबाईन, अ‍ेटूझेड तर आता ईको फिल या एजन्सीला कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कचऱ्यापासून खत निर्मिती हा प्रकल्प साकारण्यासाठी महापालिकेने जमीन अधिग्रहणसुद्धा केले आहे. १३ व्या वित्त आयोगातून त्याकरिता निधी वळता केला आहे. मात्र काही जमीन मालकांनी जमिनीला कमी दर मिळत असल्याने न्यायालयात धाव घेतल्याची माहिती आहे. जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया लांबणीवर पडत असल्याने कचऱ्यापासून खत निर्मिती हा प्रकल्प जुन्याच जागेवर सुरु करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अरुण डोंगरे यांनी घेतला आहे. त्यानुसार १५ दिवसांपूर्वी कम्पोस्ट डेपोची पाहणीदेखील एजन्सीसोबत करण्यात आली. मात्र कम्पोस्ट डेपोत कचरा जाळण्याची प्रक्रिया सुरुझाल्याने ही बाब शहरासाठी अतिशय धोकादायक ठरणारी आहे. जैविक आणि अजैविक कचरा एकाचवेळी जाळला जात असल्याने निघणारा धूर हा आरोग्यास हानीकारक ठरत आहे. प्लास्टिक निर्मितीत कॅडमियन किंवा शिशासारखे रासायनिक पदार्थांचा वापर केला जातो. प्लास्टिक जाळला गेल्यास हवेत कार्बन डॉयआॅक्सीन हा विषारी वायू मिसळत असल्याने त्यापासून मनुष्याला कर्करोग, हृदयरोग, श्वसनाचे विकार,हृद्याच्या ठोक्यात वाढ, त्वचा रोग आदी जीवघेण्या आजाराच्या सामोरे जावे लागते असे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. रासायनिक रंग, प्लॉस्टिलायझर, अ‍ॅन्टीआॅक्सीडंस, स्टॅबिलायझर्स व धातूचा वापर करुन प्लास्टिक निर्मिती केली जाते. जैविक आणि अजैविक घटकांपासून प्लास्टिक निर्मित होत असल्याने ते पर्यावरणासाठी अतिशय धोकादायक असल्याचा अहवाल पर्यावरण विभागाने दिला आहे. शहरातील लहान माठ्या नाल्यांमध्ये प्लास्टिक साचत असल्याने ते पर्यावरणासाठी फारच गंभीर बाब आहे. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर होता कामा नये, तरीदेखील व्यापारी प्लास्टिक पिशव्या वापरुन पर्यावरणाला धोका पोहचवीत आहेत. शहरात प्लास्टिक वापर बंदी हा कायदाच गुंडाळण्यात आल्याने पर्यावरणाचा ऱ्हास या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे.