शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
3
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
4
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
5
IPL 2026: वैभव-यशस्वीची धडाकेबाज जोडी फ्लॉप! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला मोठा दिलासा
6
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
7
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
8
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
9
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
10
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
11
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
12
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
13
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
14
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
15
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
16
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
17
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
18
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
19
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
20
सहलीत सेल्फीचा मोह जिवावर बेतला, मावळच्या धरणात तीन मित्र बुडाले; एकाला वाचविण्यात यश
Daily Top 2Weekly Top 5

भीतीपोटी जीवलग मित्राचा मृतदेह केला दफन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 00:04 IST

वीजपुरवठा प्रवाहित करून मासेमारी करताना एकाचा मृत्यू झाला. मात्र सोबतच्या मित्राने भीतीपोटी याची वाच्यता न करता त्याचा मृतदेह जंगलात पुरला.

ठळक मुद्देसात दिवसांनंतर प्रकरणाचा उलगडा वर्धा नदीपात्रात अंबिकापूर घाटातील घटना, घातपाताची शक्यता

सूरज डहाट ।लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : वीजपुरवठा प्रवाहित करून मासेमारी करताना एकाचा मृत्यू झाला. मात्र सोबतच्या मित्राने भीतीपोटी याची वाच्यता न करता त्याचा मृतदेह जंगलात पुरला. सात दिवसांनंतर ही घटना उघडकीस आली. शुक्रवारी तिवसा पोलिसांनी वर्धा नदीपात्राच्या अंबिकापूर घाट परिसरात पुरलेला मृतदेह बाहेर काढला.नागो रामाजी डाहे (२६,रा. तारखेड) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी गोपाल रामकृष्ण कुहिटे (२१,रा.तारखेड) या मृताच्या मित्राला ताब्यात घेतले आहे.प्राप्त माहितीनुसार, २१ जुलै रोजी मृत नागो व गोपाल दोघेही मासेमारीसाठी गेले होते. वीज प्रवाहित करून मासेमारी करीत असताना विजेच्या धक्क्याने नागोचा मृत्यू झाला. मात्र, याची माहिती कुणालाच न देता परिसरातील जनावराच्या खड्ड्यात त्याचा मृतदेह पुरला. यानंतर तो आपल्या गावी आला. मात्र, याची वाच्यता त्याने कुणाजवळच केली नाही. दरम्यान नागो बेपत्ता झाल्याने त्याबद्दलची विचारपूस सुरू झाली. यासंदर्भात नागोची आई अन्नपूर्णा हिने २५ जुलै रोजी तिवसा पोलिसात तक्रार केली. कसून चौकशी केली असता गोपलाने विजेच्या धक्क्याने नागोचा मृत्यू झाला व भीतीपोटी मृतदेह पुरल्याचे सांगितले. याआधारे तिवसा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह उखरून काढला. सात दिवस झाल्यामुळे तो कुजला होता. यामुळे घटनास्थळीच विच्छेदनाची प्रक्रिया आटोपून शव मृताच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. वृत्त लिहिस्तोवर कुणासही अटक केलेली नव्हती वा गुन्हा दाखल केलेला नव्हता. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सूर्यकांत राऊत, तिवसा ठाणेदार सतीश जाधव, कुºहा पोलीस ठाणेदार गोरखनाथ जाधवसह तिवस्याचे नायब तहसीलदार डी.टी.पंढरे उपस्थित होते....म्हणून बळावला संशयनागो बेपत्ता झाल्यामुळे त्याच्या मित्रांना विचारपूस करण्यात आली. गोपाललाही विचारण्यात आले. यावर ‘‘मला माहीत नाही, कशानेही मरेल तर माझेच नाव घ्याल का?’’असे उत्तर दिले. यामुळे मृत नागोच्या नातलगांचा संशय बळावला. यानंतर नागो बेपत्ता झाल्याची तक्रार करण्यात आली. यावर पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर गोपाल फुटला व त्याने मृतदेह पुरविल्याचे सांगितले. मृताच्या नातलगांनी घातपाताची शक्यता वर्तविली आहे.तणावसदृश स्थितीतक्रार तिवसा पोलिसांत व घटनास्थळ कुºहा पोलीस ठाण्याअंतर्गत येत असल्याने दोन्ही ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मात्र घटनेची माहिती मिळताच येथे मोठ्या संख्येने नागरिक एकत्र झाले. दरम्यान मच्छीमारदेखील आल्यामुळे थोडा तणाव निर्माण झाला होता. गर्दी पाहता पोलिसांनी घटनास्थळी दंगा नियंत्रण पथक व मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला.