शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
3
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
4
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
5
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
6
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
7
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
8
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
9
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
10
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
11
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
12
युद्धाचा फटका: रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या बोकांडी, दरात १०.८४ ते ८५.७१ टक्क्यांची वाढ
13
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
14
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
15
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
16
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
17
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
18
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
19
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
20
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
Daily Top 2Weekly Top 5

२०० जणांच्या उपस्थितीत होऊद्या आता शुभमंगल सावधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2022 05:01 IST

आता संक्रमण ओसरत असल्याचे पाहून सोमवारी महाराष्ट्र शासनाने अनेक निर्बंध शिथिल केले असल्यामुळे लग्नसोहळ्यांकरिता हॉल, लॉन्स व पटांगणातील क्षमतेच्या २५ टक्के वा जास्तीत जास्त २०० आमंत्रितांना परवानगी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे मंगल कार्यालये व नियोजित विवाह सोहळे असलेल्या कुटुंबीयांमध्ये उत्साह संचारला आहे.

मनीष तसरे लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दोन वर्षापासून सततच्या निर्बंधांमुळे लग्नसोहळ्यावर विरजण पडले होते. त्यातच लग्नसोहळ्यावर विसंबून असणाऱ्या व्यावसायिकांचेसुध्दा व्यवसाय डबघाईस आले होते. काेरोना संक्रमणाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेच्या निर्बंधांमुळे मंगल कार्यालय, लॉन्सचा व्यवसाय पूर्णत: चौपट झाला आहे. थोडी उसंत मिळताच संक्रमणाचा वेग वाढल्यामुळे शासनाला नाईलाजाने पुन्हा निर्बंध लावावे लागले. त्यामुळे मंगल कार्यालय व्यावसायिकांवर पुन्हा संकट ओढावले होते.आता संक्रमण ओसरत असल्याचे पाहून सोमवारी महाराष्ट्र शासनाने अनेक निर्बंध शिथिल केले असल्यामुळे लग्नसोहळ्यांकरिता हॉल, लॉन्स व पटांगणातील क्षमतेच्या २५ टक्के वा जास्तीत जास्त २०० आमंत्रितांना परवानगी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे मंगल कार्यालये व नियोजित विवाह सोहळे असलेल्या कुटुंबीयांमध्ये उत्साह संचारला आहे. नातेवाईकांना सोयीचे होईल अशा ठिकाणी विवाह सोहळ्याचे आयोजन करता येणार असल्याने लग्न समारंभात उत्साह दिसून येणार आहे. 

फेब्रुवारीतील लग्नाचे मुहूर्त फेब्रुवारी — ५,६,७,१०, १६,१७,२१, २४,२५,२८मार्च — १४,२३,२५,२६,२८,२९

वधू-वर पित्यांची चिंता मिटलीलग्नात नातेवाइकांना बोलावले तर आनंद वाटतो, मात्र निर्बंधामुळे आम्हाला चिंता वाटायला लागली होती. मात्र आता सूट मिळाल्याने बरे झाले. - रमेश तायडे (वधूपिता ) 

निर्बंधामुळे ५० लोकांमध्ये लग्न कसे करायचे हाच प्रश्न आम्हाला पडला होता. कुणाला बोलावयाचे कुणाला नाही याचे गणितच जुळत नव्हते. आता २०० लोकांची परवानगी मिळाल्याने बरे झाले आहे. -प्रकाश गतफणे, (वरपिता )  

मंगल कार्यालयात २५ टक्के अथवा २०० जण महाराष्ट्रातील संक्रमण ओसरत असल्याने शासनाने सोमवारी अनेक निर्बंध शिथिल केले असून,लग्नसोहळ्यांना हॉल,लॉन्स व पटागंणातील क्षमतेच्या २५ टक्के वा जास्तीत जास्त २०० आमंत्रितांना परवानगी जाहीर केली आहे.

गेल्या दोन वर्षापासून मंगल कार्यालय व्यावसायिकांवर फार वाईट दिवस आले आहे. ५० लोकांमध्ये लग्न सोहळा पार पाडतांना बऱ्याच लोकांनी मंगल कार्यालयाकडे येऊनसुध्दा पाहिले नाही, आता निर्बंध हटविल्याने लोक मंगल कार्यालयात येऊन लग्न करतील.-आकाश  देशमुख,  (मंगल कार्यालय संचालक)  

विवाह सोहळ्यांच्या आयोजनावर ज्यांचे रोजगार होते, त्यांच्यावर गेल्या दोन वर्षात अत्यंत वाईट दिवस आले आहेत. निर्बंधांमुळे व्यवसाय बुडाले नाही. आता निर्बंध हटल्यामुळे व्यवसाय होतील, अशी अपेक्षा आहे. -अमोल देशमुख,  (मंगल कार्यालय चालक)  

 

टॅग्स :marriageलग्नcorona virusकोरोना वायरस बातम्या