धारणीत कोरोना लसीकरणाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:32 IST2021-02-05T05:32:32+5:302021-02-05T05:32:32+5:30

अधिपरीचारिका, चालकाला टोचली पहिली लस धारणी : तालुक्यात कोरोना लसीकरणाला शुक्रवारी सुरुवात झाली. तालुक्यातून कोरोनाची पहिली लस उपजिल्हा रुग्णालयातील ...

Beginning of corona vaccination in retention | धारणीत कोरोना लसीकरणाला सुरुवात

धारणीत कोरोना लसीकरणाला सुरुवात

अधिपरीचारिका, चालकाला टोचली पहिली लस

धारणी : तालुक्यात कोरोना लसीकरणाला शुक्रवारी सुरुवात झाली. तालुक्यातून कोरोनाची पहिली लस उपजिल्हा रुग्णालयातील अधिपरिचारिका सविता भुसुम व तालुका वैदयकीय अधिकारी यांच्या शासकीय वाहनावरील चालक अन्वर खान यांना दिली गेली. आरोग्य सेविका जयश्री राठोड यांनी त्यांचे लसीकरण केले.

तत्पूर्वी, आमदार राजकुमार पटेल यांनी लसीकरण वाॅर्डाचे उदघाटन केले. याप्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी शशिकांत पवार, अधीक्षक रेखा गजरालवार, सभापती सुलोचना जाभे, कंत्राटदार सचिन पटेल, गटविकास अधिकारी काळे, विस्तार अधिकारी सपकाळ, डॉ. धनंजय पाटीलसह आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. जिल्हास्तरावरून धारणी तालुक्याकरिता पाचशे कोरोना वॅक्सीन पाठविण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागातील ३०० कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरणाचा लाभ मिळणार आहे.

Web Title: Beginning of corona vaccination in retention