शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

डेहणी येथे श्रमदानातून साकारला बंधारा

By admin | Updated: May 31, 2016 00:27 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारातून प्रेरणा घेत पाणी ‘अडवा पाणी जिरवा’चा संदेश देत पाच तास भर उन्हात श्रमदान करीत...

युवकांचा संयुक्त उपक्रम : 'लोकमत जलमित्र अभियाना'ची प्रेरणातिवसा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारातून प्रेरणा घेत पाणी ‘अडवा पाणी जिरवा’चा संदेश देत पाच तास भर उन्हात श्रमदान करीत राष्ट्रसंत तुकडोजी युवक विचार मंच तिवसाचे कार्यकर्त्यांनी तिवसा तालुक्यातील डेहणी गावात सूर्यगंगा नदीवर श्रमदानातून बंधारा बांधला.देशात सर्वत्र दुष्काळाची परिस्थिती आहे. यामुळे जनतेसह शेतकरी संकटात आहेत. यासाठी विविध योजना राबवीत असले तरी ग्रामीण भागात शेतकरी वर्गांचे काय हाल आहे, हे शेतकऱ्यांनाच माहीत आहे. मागेल त्याला शेततळे, असा सरकारचा नारा आहे. ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ असा शासनाचा नारा असला तरी प्रत्यक्षात काहीच नाही. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेतून सांगातत. श्रमदानाचे सप्ताह घेवोनी ! रस्ते दुरुस्त करावे सर्वांनी ! शोषक खड्डे, मोऱ्या करोनी ! सांडपाणी थांबवावे!! सामुदायिक प्रयत्नांनी सामर्थ वाठे कोणोकणी जीथे नसे घोटभर पाणी तथे सरिता वाहू लागे ! हा महाराजांचा संदेश घेत तिवसा व डेहणी येथील युवकांनी श्रमदान करत बंधारा धांणला. यावेळी तालुकाध्यक्ष अमर वाखडे, सचिव अभिमत शिरभाते, शाखा अध्यक्ष संकेत कुबडे, विवेक सोनोने, तेजस खंडार, अजय भागवत, अनिकेत चौधरी, शैलेश ताकपिरे, कुंंदन कुबडे, आशिष होल्हेसह युवकांनी श्रमदान केले. (प्रतिनिधी)शेतीसाठी पाणी व भविष्यात पाण्याची गरज पाहता पाण्याची टंचाई भासू नये यासाठी लोकमत जलमित्र अभियानातून बंधाऱ्याची प्रेरणा घेतली आहे. व युवकांच्या सहकार्याने बंधारा बांधला आहे.- अमर वानखडे,तालुकाध्यक्ष,रा.तु.म.यु.विचार मंच