शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
2
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
3
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
4
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
5
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
6
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
7
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
9
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
10
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
11
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
12
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
13
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
14
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
15
‘तुम्ही घुसखोर आहात का? हे सिद्ध करण्याची वेळ आणू नका’ म्हाडाच्या उपाध्यक्षांची नागरिकांना दमदाटी
16
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
17
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
18
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
19
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
20
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
Daily Top 2Weekly Top 5

१२ वर्षांत आॅगस्ट महिना सर्वात उष्ण-शुष्क

By admin | Updated: September 5, 2016 00:14 IST

ंमागील बारा वर्षांत यंदा आॅगस्ट महिन्यात सर्वात कमी पाऊस पडला असून यंदा हा महिना सर्वात उष्ण व शुष्क असल्याचे निष्पन्न झाले आहे.

सर्वात कमी पाऊस : ३५ डिग्री सेल्सीअस तापमानाचा उच्चांक वैभव बाबरेकर अमरावतींमागील बारा वर्षांत यंदा आॅगस्ट महिन्यात सर्वात कमी पाऊस पडला असून यंदा हा महिना सर्वात उष्ण व शुष्क असल्याचे निष्पन्न झाले आहे. या महिन्यात कमाल तापमानाने ३५ डिग्री सेल्सीअसचा उच्चांक गाठल्याने हे तापमान सरासरीपेक्षा अधिक होते. आॅगस्ट २०१६ मध्ये विदर्भात सरासरीपेक्षा बराच कमी पाऊस पडला. जिल्ह्यात सरासरीपेक्षा पावसाचे प्रमाण ४५ टक्के कमी होते. परंतु जून आणि जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे सद्यस्थितीत विदर्भात ४ टक्के सरप्लस (सरासरीपेक्षा अधिक) असल्याचे मत हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांचे आहे. केवळ पावसाच्या नोंदीच नव्हे तर, पावसाळ्यात तापमानाच्या नोंदी घेणेही आवश्यक आहे. ९ सप्टेंबरपर्यंत कमी-अधिक उघाडीची शक्यता वायव्य बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्याची स्थिती ४.५ किमी उंचीवर आहे. येत्या ४८ तासांत याचे कमी दाबाच्या क्षेत्रात परिवर्तन होण्याची शक्यता आहे. मान्सुनच्या कमी दाबाच्या द्रोणिय पट्ट्याचा अक्ष हिमालयाच्या पायथ्याशी सरकला आहे. महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीवर कमजोर द्रोणिय स्थिती आहे. यामुळे ९ सप्टेंबरपर्यंत कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस कमी होणार असून काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे. कमी अधिक प्रमाणात उघाड राहून काहीसे ढगाळ तर कोठे सूर्यप्रकाश राहण्याची शक्यता हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली आहे.