दराबाबत विचारले घोडेवाल्याने बदडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:26 IST2021-09-02T04:26:10+5:302021-09-02T04:26:10+5:30

---------------- ट्रिपल सीट दुचाकीने दिली धडक धारणी : तालुक्यातील दिया येथे सूरज रामचंद्र बोरसे (१८, रा. हरदोली) या युवकाला ...

Asked about the price, the horseman turned around | दराबाबत विचारले घोडेवाल्याने बदडले

दराबाबत विचारले घोडेवाल्याने बदडले

----------------

ट्रिपल सीट दुचाकीने दिली धडक

धारणी : तालुक्यातील दिया येथे सूरज रामचंद्र बोरसे (१८, रा. हरदोली) या युवकाला एमएच २७ सीएस ५९७७ या क्रमांकाच्या अन्य दुचाकीने धडक दिली. यात या युवकाच्या हाताला फ्रॅक्चर झाला आहे. त्या दुचाकीवर अनोळखी तिघे स्वार होते, असे धारणी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत सूरजने नमूद केले.

------------------

मुलीला फूस लावून पळविले

अंजनगाव सुर्जी : शहरातील पानअटाई परिसरातून एका इसमाने १७ वर्षीय मुलीला पळवून नेल्याची तक्रार अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

---------------------

सार्वजनिक शौचालयावरील टाकी लंपास

धारणी : हरिसाल येथील फैलढाणा येथे सार्वजनिक शौचालयावर लावलेली पाण्याची टाकी तिघांनी लंपास केल्याची तक्रार जानराव मावस्कर (३८) यांनी धारणी पोलीस ठाण्यात नोंदविली. पोलिसांनी शेख दाऊद शेख रऊफ, बंटी चव्हाण, राजेंद्र चव्हाण (सर्व रा. हरिसाल) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.

--------------

बेलोरा शिवारातून ५० हजारांचे नोझल लंपास

चांदूर बाजार : तालुक्यातील मौजा बेलोरा ते मौजा रमदलपूर शिवारात मदन मोतीराम घरडे (५५, रा. बेलोरा) यांच्यासह श्रीकांत दुरगुडे, स्वप्निल वर्हेकर, सुनील सिंगण, सुरेश बोबडे, नाना घरडे, डा. झगडे यांच्याकडील एकूण १२३ पितळी नोझल चोरट्यांनी लंपास केले. शेतकºयांचे ४९ हजार २०० रुपयांचे नुकसान झाले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

-----------------

Web Title: Asked about the price, the horseman turned around