हिवाळी २०२० परीक्षांचे अर्ज १२ फेब्रुवारीपर्यत स्वीकारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:20 IST2021-02-06T04:20:47+5:302021-02-06T04:20:47+5:30

अमरावती: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीने हिवाळी- २०२० परीक्षेसाठी पात्र विद्यार्थ्यांना १२ फेब्रुवारीपर्यंत परीक्षा अर्ज सादर करता येणार ...

Applications for Winter 2020 exams will be accepted till 12th February | हिवाळी २०२० परीक्षांचे अर्ज १२ फेब्रुवारीपर्यत स्वीकारणार

हिवाळी २०२० परीक्षांचे अर्ज १२ फेब्रुवारीपर्यत स्वीकारणार

अमरावती: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीने हिवाळी- २०२० परीक्षेसाठी पात्र विद्यार्थ्यांना १२ फेब्रुवारीपर्यंत परीक्षा अर्ज सादर करता येणार आहे. या तारखेच्या आत परीक्षा अर्ज सादर करावे, असे आवाहन परीक्षा संचालक हेमंत देशमुख यांनी केले आहे.

सत्र पद्धती अभ्यासक्रमाच्या (नियमित) सत्र १, ३, ५, ७ व ९ च्या सर्व परीक्षांमध्ये बी.ई., बी.टेक., बी.टेक्स्ट., बी.आर्च. परीक्षा वगळून, सत्रपद्धती अभ्यासक्रमाच्या (नियमित) बी.ई., बी.टेक., बी.टेक्स्ट., सत्र १ व ३ च्या परीक्षा, बी.आर्च. सत्र १ च्या परीक्षा, बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. सत्र १ व २ च्या माजी विद्यार्थ्यांच्या बी.ई., बी.टेक., बी.टेक्स्ट., बी.आर्च. मधील सर्व सत्रांच्या माजी विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे अर्ज ३ ते १२ फेब्रुवारी २०२१ दरम्यान ऑनलाईन सादर करावयाचे आहेत. महाविद्यालयाने विद्यापीठात ऑनलाईन परीक्षा आवेदनपत्रे सादर केलेल्या विद्यार्थ्यांची यादी व शुल्क पावत्या सादर करावयाची तारीख परीक्षा विभागाने अधिसूचनेद्वारे कळविली आहे.

Web Title: Applications for Winter 2020 exams will be accepted till 12th February