शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

रोहिणीखेड्यापाठोपाठ गौलानडोह येथेही आढळल्या पुरातन वस्तू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:33 IST

फोटो - धारणी २७ एस बांगड्यांचे फोटो व्हायरल, गावात चर्चेला पेव, रोहयोत खोदकाम करणारा युवक झाला अर्धविक्षिप्त, पोलीस पाटलाची ...

फोटो - धारणी २७ एस

बांगड्यांचे फोटो व्हायरल, गावात चर्चेला पेव, रोहयोत खोदकाम करणारा युवक झाला अर्धविक्षिप्त, पोलीस पाटलाची सक्रिय भूमिका श्यामकांत पाण्डेय :

धारणी : तालुक्यातील गौलानडोह या गावातील मजूर रोजगार हमी योजनेच्या कामाकरिता १५ जानेवारी रोजी गावालगत असलेल्या टेकड्यांमध्ये खोदकाम करीत असताना पुरातन काळातील बांगड्या आढळल्याची माहिती आहे. ही बांगडी पोलिस पाटलाच्या मुलीकडे असून, खोदकाम करणारा युवक अर्धविक्षिप्त झालेला आहे . त्याच्यावर तंत्र-मंत्रच्या साहाय्याने उपचार सुरू असून, हे प्रकरण गावस्तरावर दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे.

प्रजासत्ताक दिनी दुपारी ३ वाजता सदर प्रतिनिधीने गौलानडोह गाठून पाहणी केली असता, तो २० वर्षीय अर्धविक्षिप्त युवक आर्थिक विपन्नावस्थेत इतर दोन भाऊ व विधवा आई सोबत कसेबसे जीवन जगत असल्याचे आढळले. खोदकामापासूनच त्याच्या डोक्यावर विपरीत परिणाम झाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. त्यासाठी स्थानिक उपचारकर्त्याकडून तोडगे आणले जात असल्याचे त्यांनी सांगतिले. आपला मुलगा बरा व्हावा, यात सारे काही आले, असे केविलवाणा चेहरा करीत त्याच्या विधवा आईने सांगितले.

खोदकामदरम्यान पाच बांगड्या आढळल्याचे अर्धविक्षिप्त अवस्थेला पोहोचलेल्या तरुणाने सांगितले . मात्र, ही बांगडी तिच्या पाठीमागे काम करीत असलेल्या पोलीस पाटलाच्या मुलीने ठेवून घेतल्या. दुसऱ्या दिवशीसुद्धा पोलीस पाटलाने त्याला संबंधित घटनास्थळावर घेऊन जाऊन अधिक खोदकाम केले असता, पुन्हा काही वस्तू आढळल्याचे त्याने सांगितले. तथापि, ते नेमके काय, याचे गुपित बाहेर आलेले नाही .

ज्या दिवशी खोदकाम झाले, त्या दिवसापासून तो युवक सैरावैरा पळू लागला होता. त्याला गावातील मांत्रिकाकडून उपचार करून काही प्रमाणात बरे झाल्याची माहिती त्याने स्वतः दिली.

खोदकामादरम्यान प्राप्त झालेल्या बांगडीबाबत चौकशी केली असता, रोजगार सेवकाकडे त्या बांगड्या पोलीस पाटलांनी दिल्याची माहिती मिळाली. रोजगार सेवक घरी आढळून आला नाही . परंतु, कुटुंबीयांनी त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे खोदकामतील वस्तू नसल्याचे सांगितले . याउलट गावातील अन्य एका व्यक्तीचे नाव त्यांनी घेतले. याबाबत पोलीस पाटलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तेही गावात आढळून आले नाही . त्यामुळे याप्रकरणी त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. संबंधित बीटच्या पोलीस अधिकाऱ्याला याबाबत कळविण्यात आले असले तरी वृत्त लिहीपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही.

--------------------

मोगलकालीन नाणी

यापूर्वीसुद्धा रोहिणीखेडा या गावात खोदकामादरम्यान मोगलकालीन चलन प्राप्त झाले होते. त्याची शाई मावळण्यापूर्वीच गौलानडोह या गावातसुद्धा गुप्तधन मिळाल्याची अफवा जोरात सुरू आहे. याबाबत गावामध्ये तणाव असून, दबक्या आवाजात सर्व गावकरी या घटनेला दुजोरा देतात. आता याकडे पोलीस प्रशासन कशा प्रकारची कारवाई करते, याची सर्वांना प्रतीक्षा आहे.

-------------

गौलानडोह येथील खोदकामात मिळालेली बांगडी ही पोलीस पाटलाकडून ताब्यात घेण्यात आली आहे . सदर धातूची सोनाराकडून तपासणी करून घेतली. हा कांस्य धातू असून, अंदाजे वीस ते पंचवीस वर्षे जुने आहे . याप्रकरणी संबंधित यांचे बयान नोंदविण्यात आले असून, सदरहू जप्त केलेली बांगडी महसूल विभागाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.

- प्रशांत गीते , सहायक पोलीस निरीक्षक, धारणी