शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यस्थीच्या आडून ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
2
Latest Marathi News LIVE Updates: पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली, ४ प्रवासी असल्याची माहिती
3
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
4
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
5
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
6
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
7
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
8
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
9
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
10
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
11
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
12
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
13
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
14
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
15
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
16
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
17
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
18
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
19
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
20
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
Daily Top 2Weekly Top 5

टाकरखेड्यातील ‘त्या’ दाव्याचे अंनिसकडून सत्यशोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:30 IST

किशोर मोकलकर ; फोटो पी १२ आसेगाव फोल्डर आसेगावपूर्णा : रहस्यमय आगीमुळे आपल्या घरातील काही कपडे पेटत असल्याच्या ...

किशोर मोकलकर

;

फोटो पी १२ आसेगाव फोल्डर

आसेगावपूर्णा : रहस्यमय आगीमुळे आपल्या घरातील काही कपडे पेटत असल्याच्या पातालबन्सी कुटुंबांच्या दाव्याचे शनिवारी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीने सत्यशोधन केले. स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने ‘टिम ‘अभाअंनिस’ने दाव्याची पडताळणी केली. सदर प्रकार हा मानवी हस्तक्षेपातून घडला आहे, असा निष्कर्ष अभाअंनिसने नोंदविला आहे.

‘लोकमत’ मध्ये प्रकाशित वृत्ताची तातडीने दखल घेत अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मुुलन समितीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य गणेश हलकारे, शेखर पाटील, हरीष केदार, राजू खिराडे,उल्का पाटील, कांचन दावेदार, सुनील पापडकर, ज्ञानेश्वर दाहेदार, संजय जिचकार, रवींद्र कोडे, प्रकाश कळसकर यांनी शनिवारी टाकरखेडा पुर्णा गाठून पातालबन्सी कुटुंबियांशी चर्चा केली. त्यांचेकडून एकंदर प्रकरण जाणून घेतले. तथा ती आग रहस्यमय नसून मानवी हस्तक्षेपामुळे लागली असल्याचा निष्कर्ष काढला. यावेळी आसेगावचे सहायक पोलिस निरीक्षक समाधान वाठोरे, सतीश प्रधान हे त्यांच्यासमवेत होते. घटनेची पडताळणी करून पुन्हा असा प्रकार होणार नसल्याचे समितीने कुटूंबाला सांगितले.

विद्युत पुरवठा जोडला

पातालबंसी कुटुंबाच्या घरात घडणाºया आगीच्या मुळाशी शॉर्ट सर्किट असल्याच्या संशयामुळे विद्युत पुरवठा बंद करण्यात आला होता. तो आता पुर्ववत करण्यात आला.

पातालबंसी कुटुंबीयांची पडताळणी

अभाअंनिसने पातालबन्सी कुटुंबातील एका-एका सदस्याची बंद दाराआड पडताळणी केली. सर्वांंची पडताळणी झाल्यानंतर सर्वांना एकत्र बसून पुन्हा आपल्या घरात असा प्रकार होणार नाही, असे समितीने कुटुंबीयांना आश्वासन दिले. कुटुंबीयांनीही दोन तीन दिवसांपासून असला प्रकार होत नसल्याचे सांगितले.

कोट

सदर प्रकरणाचे सत्यशोधन केल्यानंतर हा प्रकार अमानवीय वा कुठल्याही शक्तीने घडत नसून तो मानवी हस्तक्षेपामुळे घडला आहे. समितीच्या धोरणानुसार संबंधितांचे नाव जाहिर करता येणार नाही. हा प्रकार आता बंद होईल.

गणेश हलकारे,

राष्टÑयि कार्यकारिणी सदस्य

अभाअंनिस

-----