अंजनगावचा पाणीपुरवठा मजीप्राकडून बंद (संक्षिप्त)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:33 IST2021-02-05T05:33:03+5:302021-02-05T05:33:03+5:30

------- मक्रमपुर येथे कापूस फरदड निर्मूलन प्रात्यक्षिक तालुका कृषी विभागाचे आयोजन टाकरखेडा संभू : भातकुली तालुक्यातील मक्रमपूर येथे कापूस ...

Anjangaon water supply cut off from Majipra | अंजनगावचा पाणीपुरवठा मजीप्राकडून बंद (संक्षिप्त)

अंजनगावचा पाणीपुरवठा मजीप्राकडून बंद (संक्षिप्त)

-------

मक्रमपुर येथे कापूस फरदड निर्मूलन प्रात्यक्षिक

तालुका कृषी विभागाचे आयोजन

टाकरखेडा संभू : भातकुली तालुक्यातील मक्रमपूर येथे कापूस फरदड निर्मूलन अंतर्गत शेतकऱ्यांना कीड नियंत्रणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे, पोलीस पाटील विवेक आखरे, देवेंद्र जुनघरे , नीलेश आखरे, अरविंद गोरले, सचिन आखरे, विजू किटुकले, कृषी पर्यवेक्षक अविनाश पांडे, कृषी सहायक आशिष तायडे, रूपाली ठाकरे व शेतकरी उपस्थित होते.

-------------

श्री विवेकानंद विद्यामंदिरात प्रजासत्ताक दिन

मोर्शी : पिंपळखुटा मोठा येथील श्री विवेकानंद विद्यामंदिरात सरपंच शुभांगी मोगरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी दहावीच्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. याप्रसंगी प्रमोद ईखे, बाबाराव निकम, मुख्याध्यापक सुदर्शन देशमुख, उपसरपंच भास्करराव अढाऊ, संजय आकोलकर, अमोल चौधरी, सादिक अली, विठ्ठलराव उघडे, ए.यू. नवघरे, एस.बी. कोरडे, मारोतराव गायकवाड, जंगलाजी पारिसे आदी उपस्थित होते.

--------------

Web Title: Anjangaon water supply cut off from Majipra