शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आणि तो जन्मदात्याच्या डोळ्यांदेखत बुडाला!

By admin | Updated: September 28, 2015 00:22 IST

२५ वर्षांचा सळसळत्या रक्ताचा तरूण. गावातील गणेशोत्सव मंडळाचा उत्साही कार्यकर्ता. प्रत्येक आयोजनात त्याचा सक्रिय सहभाग.

आसेगाव हळहळले : पट्टीच्या पोहणाऱ्याचा पाण्यातच मृत्यू ,गणपती विसर्जनाच्या आनंदावर विरजण श्याम होले  आसेगाव पूर्णा२५ वर्षांचा सळसळत्या रक्ताचा तरूण. गावातील गणेशोत्सव मंडळाचा उत्साही कार्यकर्ता. प्रत्येक आयोजनात त्याचा सक्रिय सहभाग. दहा दिवस त्याने उत्साहात गणेशोत्सव साजरा केला. रविवारची अनंत चतुर्दशी मात्र, त्याच्यासाठी काळ बनून आली. कुटुंबीयांसह घरगुती गणेश विसर्जनासाठी तो नदीवर गेला आणि पट्टीचा पोहणारा असूनही कुटुंबीयांच्या डोळ्यांदेखत त्याचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूमुळे अख्खे गाव हळहळले. नाना भारत वाटाणे. बालवीर गणेशोत्सव मंडळाचा सक्रिय कार्यकर्ता. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे तो त्याच्या घरच्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी पूर्णानदीवर गेला. सोबत होते त्याचे वडील भारत वाटाणे आणि मोठे काका रमेशपंत वाटाणे तसेच कुटुंबातील इतरही सदस्य. नदीवर पोहोचताच त्याने प्रथम पूर्णा नदीत आंघोळ केली आणि पलिकडच्य काठावरून पूजेसाठी रेती आणली. गणेशाची पूजा व आरती केली. त्यानंतर तो दरवर्षीप्रमाणे गणपतीची मूर्ती डोक्यावर घेऊन नदीच्या पात्रात उतरला. पण, दुर्देवाने नदीपात्रावरील खडकावरून त्याचा पाय घसरला आणि तो पुलानजीकच्या खोल डोहात ओढला गेला. पाण्यात गटांगळ्या खात असताना अनेक जण त्याला पाहात होते. पण, तो पट्टीचा पोहणारा असल्याने तो बुडेल, असे कोणालाच वाटले नाही. त्यामुळे नाना थट्टा करतोय, असाच प्रत्येकाचा समज झाला. पण, जेव्हा त्याचे डोकेही पाण्याखाली गेले तेव्हा सगळ्यांचे श्वास रोखले गेले. मग, एकच धावाधाव सुरू झाली. यावेळी अन्य कोणीच पट्टीचा पोहणारा उपस्थित नव्हता. काही वेळाने पोहता येणारा युवक अभिषेक मानकर हा तेथे पोहोचला. त्याने पोहत जाऊन नानाला पकडण्याचा प्रयत्न केला.काळाने घातली झडपअमरावती : पाणी अधिकच खोल असल्याने त्याचेही अवसान गळाले आणि नाना त्याच्या हातून निसटला. त्यानंतर १० मिनिटांनी टाकरखेडा आणि आसेगाव येथील सुमारे २० ते २५ तरूणांनी पाण्यात उतरून त्याचा शोध घेतला. पण, त्यांना नानाचा थांगपत्ता लागला नाही. शेवटी कसाबसा तो आढळून आला. नानावर प्रथमोपचार करून त्याला आरोग्य केंद्रात नेण्यात आले त्यानंतर जिल्हा सामान्य रूग्णालयात आणण्यात आले. परंतु पाण्याखाली तब्बल अर्धा तास राहिल्याने त्याचा नदीमध्येच बुडून मृत्यू झाला होता. नानाच्या आकस्मिक मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे. या दुर्घटनास्थळी नदीपात्रामध्ये मोठमोटे खड्डे असून त्यावरून वेगाने पाणी प्वाहते. त्यामुळे खडकाच्या बाजूला मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. यापूर्वी येथे दोघांचे बळी गेले आहेत. घटनेनंतर आसेगाव पोलिसांनी घटनास्थळा भोवताल पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.