शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

बारावीच्या निकालाने वझ्झरचे बालसुधारगृह आनंदले

By admin | Updated: May 26, 2016 01:11 IST

वझ्झर येथील स्व. अंबादासपंत मतिमंद अंध-अपंग, बाल सुधारगृहातील समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांच्या माला व गांधारी या दोन्ही मानसकन्यांनी ...

उत्साह : शंकरबाबांच्या माला-गांधारी उत्तीर्णनरेंद्र जावरे परतवाडावझ्झर येथील स्व. अंबादासपंत मतिमंद अंध-अपंग, बाल सुधारगृहातील समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांच्या माला व गांधारी या दोन्ही मानसकन्यांनी इयत्ता बारावीच्या परीक्षेत प्रथमश्रेणी टक्केवारीत यश संपादन केले. त्यांच्या या यशाने बालसुधारगृहात आनंद संचारला आहे.निराधार, निराश्रित, अपंग अंध मुला-मुलींचे आई-वडिल म्हणजे शंकरबाबा होय. बेवारस मुलांना उचलून जगण्याचा अधिकार व शिक्षणाचा मार्ग दाखविणाऱ्या शंकरबाबा पापळकर यांच्या माला व गांधारी या दोन्ही मानसकन्यांनी अंध असताना डोळस विद्यार्थ्यांसोबत बारावीची परीक्षा दिली होती. ७१ टक्के, तर माला ७२ टक्के गुण घेऊन प्रथम श्रेणीत आली. परतवाडा येथील आईएस गर्ल्स शाळेच्या दोघी विद्यार्थिनी आहेत. अधीक्षिका प्रमिला नघाटे, श्रीनाथ, तुरखेडे, धोपटे, काटोलकर, मानकर आदींचे सहकार्य लाभले. मालासाठी नूतन भिडकर व गांधारीसाठी काजल दाने या विद्यार्थिनी परीक्षेत लेखन मदतनीस होत्या.मालाला आयएएस व्हायचंयमाला हिला उच्च शिक्षण घेत आयएएस अधिकारी तर गांधारीला संगीताची आवड असल्याने संगीततज्ज्ञ व्हायचे असल्याचे त्यांनी सांगितले. पुढे उच्च शिक्षण घेत बाबांचे नाव आणखी मोठे करायचे आहे, असेही त्या म्हणाल्या.‘लोकमत’मुळे आईची अडचण हटलीमाला व गांधारी दहावीच्या शालांत परीक्षेत असताना त्यांचा निकाल आईच नसल्याने बोर्डाने थांबविला होता. लोकमतने बोर्डाच्या लक्षात ही बाब आणून दिली होती. माझ्या दोन्ही मुली मोठ्या टक्केवारीने उत्तीर्ण झाल्या. यापेक्षा मोठा आनंद याबाबाला काय हवा. सर्वांचा आशिर्वाद त्यांच्या पाठिशी आहे.- शंकरबाबा पापळकर, ज्येष्ठ समाजसेवक, अचलपूर