शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

तासभराचा भोजन अवकाश तरीही कामे सावकाश !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2022 05:00 IST

राज्य शासनाने २४ फेब्रुवारी २०२० च्या आदेशानुसार शासकीय कार्यालयाचा पाच दिवसाचा आठवडा लागू केला आहे. यानुसार कार्यालयीन कामकाजाच्या वेळेमध्येही बदल केला. सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.४५  ते ६.१५, तर कार्यालयातील शिपायाकरिता ९.३० ते ६.३० अशी वेळ निश्चित केली आहे. पाच दिवसांचा आठवडा असल्याने आणि अधिकारी व कर्मचारी शासकीय काम महिनाभर काम या वृत्तीने काम करीत असल्याने कामाचा खोळंबा होत आहे.

 जितेंद्र दखनेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेत  ग्रामीण भागातून कामानिमित्त येणाऱ्या  अभ्यागताची संख्या मोठी असल्याने वर्दळ कमी होत नाही. दुपारी मात्र त्यांचे काम होत नाही. कारण दुपारी एक ते अडीच ते तीन वाजेपर्यंत लंच टाईम सांगितला जातो. त्यामुळे कामानिमित्त आलेल्यांना आल्यापावली परत जावे लागते किंवा अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रतीक्षेत वेळ घालवात बसावे लागत असल्याचे दिसून आले.राज्य शासनाने २४ फेब्रुवारी २०२० च्या आदेशानुसार शासकीय कार्यालयाचा पाच दिवसाचा आठवडा लागू केला आहे. यानुसार कार्यालयीन कामकाजाच्या वेळेमध्येही बदल केला. सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.४५  ते ६.१५, तर कार्यालयातील शिपायाकरिता ९.३० ते ६.३० अशी वेळ निश्चित केली आहे. पाच दिवसांचा आठवडा असल्याने आणि अधिकारी व कर्मचारी शासकीय काम महिनाभर काम या वृत्तीने काम करीत असल्याने कामाचा खोळंबा होत आहे. मेळघाटसह गैरआदिवासी भागातून नागरिक तक्रारी, गऱ्हाणी, निवेदन, अर्ज घेऊन कार्यालयात येत असतात. परंतु, बरेचदा अधिकारी व कर्मचारी जागेवर उपलब्ध होत नाही. त्यांना विचारणा केली, तर जेवणाची वेळ आहे, असे सांगून मोकळे होतात. म्हणून पाच दिवसांच्या आठवड्यासंदर्भात काढलेल्या आदेशांमध्ये भोजनाची वेळ दुपारी १ ते २ अशी करण्यात आली. या वेळेत केवळ अर्धा तासात भोजन अवकाश देण्यात आला आहे. परंतु जिल्हा परिषदेचे कर्मचारी तासभराहून अधिक वेळ भोजन अवकाशात घालवतात. यामुळे कामे सावकाश करताना दिसत आहेत.

कार्यालयीन वेळेत घरगुती कामाकडे लक्ष- बऱ्याच विभागातील कर्मचारी लंच टाइममध्ये जेवण करण्याकरता घरी जातात. त्यामुळे अर्ध्या तासाऐवजी त्यांचे एक  ते दीड तास तशीच निघून जातात. कार्यालय वेळेची बंधने येथे पाळली जात नसल्याचे चित्र आहे.

काय म्हणतो शासनाचा आदेश?राज्य शासकीय कार्यालयातील भोजनाच्या वेळेबाबत शासनाने ४ जून २०१९ रोजी काढलेल्या आदेशानुसार अधिकारी व कर्मचारी करता कार्यालयीन वेळेत भोजनासाठी दुपारी १ ते २ वाजता  अर्धा तासाची वेळ असावी, अशा सूचना आहेत. 

कार्यालयीन वेळा सर्वांनी पाळल्याच पाहिजे, कार्यालय वेळेचा दुरुपयोग होत असेल किंवा भोजन अवकाशानंतर  कर्मचारी उपस्थित राहत नसतील तर योग्य ती कारवाई केली जाईल.- तुकाराम टेकाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारीसामान्य प्रशासन

मेळघाटसारख्या दुर्गम भागातून आल्यानंतर बरेचदा अधिकारी, कर्मचारी वेळेत भेटत नाही. हा प्रकार थांबला पाहिजे. - कुलदीप काळबांडे, नागरिक

 

टॅग्स :zpजिल्हा परिषद