शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीचा भाग्यविधाता!

By admin | Updated: May 16, 2015 00:48 IST

विदर्भाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या अमरावतीला महानगराचा दर्जा मिळाला हे खरे.

गणेश देशमुख अमरावतीविदर्भाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या अमरावतीला महानगराचा दर्जा मिळाला हे खरे. तथापि, महापालिकेचे पोटार्थी प्रशासन आणि बेशिस्त शासनाच्या कारभारात बुजलेला महानगराचा चेहरा कोरून त्याला अस्तित्व प्रदान करणारा शिल्पकार या शहराच्या वाट्याला आलाच नव्हता. सर्वत्र निराशेचा काळोख गडद असताना अचानक सूर्योदय व्हावा तसा चंद्रकांत गुडेवारांचा अमरावती शहरात आशादायी प्रवेश झाला. अमरावती महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारताच गुडेवार यांनी कारवाईचा जो अविश्वसनीय धडाका सुरू केला तो बघून शहराला भाग्यविधाता मिळाल्याचा आनंद सामान्य नागरिकांच्या चेहऱ्यावर अलगद टिपता येतो. 'टॉक आॅफ दी टाऊन'हल्ली अमरावती शहरात एकच चर्चा आहे, ती म्हणजे चंद्रकांत गुडेवार आणि त्यांची कार्यशैली! गुडेवार हे त्यांच्या प्रामाणिक आणि कर्तव्यकठोर कार्यप्रणालीमुळे 'टॉक आॅफ दी टाऊन' ठरले आहेत. नायक या हिंदी चित्रपटातील 'सामान्यांचा मुख्यमंत्री' या भूमिकेतील अनिल कपूरप्रमाणेच गुडेवार हे केवळ महिनाभरात 'सामान्यांचे आयुक्त' ठरले आहेत. लोकांमध्ये गुडेवारांबाबत आता औत्सुक्य निर्माण झाले आहे. एरवी अधिकाऱ्यांबाबत अविश्वास आणि अपशब्द व्यक्त करणारी जनता गुडेवार यांना भेटण्यास उत्सुक होते, अभिनंदन करू इच्छिते, ही गुडेवारांच्या लोकाभिमुख कार्यप्रणालीची पावती होय. सामान्य तरीही निडर!बोलताना ग्रामीण भाषेचा वापर करणारे, राहणीमान नीटनेटके ठेवताना त्यात आवर्जून सामान्य 'टच' जपणारे, चष्म्याची फ्रेम असो वा कमरेचा पट्टा- सर्वसामान्यांप्रमाणेच वस्तू वापरणारे चंद्रकांत गुडेवार हे लोकांना त्यांच्यातीलच एक भासतात. ते कुणाला एकटे भेटलेच तर महापालिका आयुक्त असल्याचा जराही दर्प त्यांच्या व्यक्तिमत्त्वात येणार नाही, इतका त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सामान्यपणा रूळलेला! बाह््यांगी सामान्य दिसणाऱ्या या व्यक्तिमत्त्वामागे मात्र एक निडर, चाणाक्ष आणि सतर्क अधिकारी सतत कार्यरत असतो. महिनाभरात चंद्रकांत गुडेवार यांनी केलेल्या कारवाईचा हा आलेखसांस्कृतिक भवन आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी आठ जणांविरुद्ध फौजदारी कारवाईस्वच्छता विभागप्रमुख देवेंद्र गुल्हाने यांचे निलंबनक्रीडा विभागातील कारकून प्रशांत पवार यांचे निलंबनबाजार व परवाना विभाग पथकाचे अधीक्षक गंगाप्रसाद जयस्वाल यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी,लवकरच फौजदारी कारवाईतक्रारप्राप्त चार इमारतींना बांधकाम पाडण्याच्या नोटीशीकल्याण नगरातील नियमबाह्य चार मजली 'फ्लॅट स्किम'चे बांधकाम पाडलेहॉटेल 'महेफिल इन'ने विनापरवानगी खोदकाम केल्यामुळे पाच लक्ष रुपयांचा दंड आणि पोलिसात तक्रारशमिम बानो सादिक आयडिया या नगरसेविकेचे सदस्यत्व रद्द