अमरावतीत विदर्भ 'अ‍ॅडव्हॉन्टेज' परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

By Admin | Updated: August 23, 2014 23:43 IST2014-08-23T23:43:46+5:302014-08-23T23:43:46+5:30

पश्चिम विदर्भातील अमरावती, यवतमाळ अकोला, वाशीम व बुलडाणा या पाच जिल्ह्यांचा औद्योगिक विकास व्हावा, यासाठी नागपूरप्रमाणेच अमरावती येथे विदर्भ 'अ‍ॅडव्हॉन्टेज' परिषद आयोजित करावी,

In the Amravati Vidarbha 'Advanceage' conference, the Chief Minister will hold the meeting | अमरावतीत विदर्भ 'अ‍ॅडव्हॉन्टेज' परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

अमरावतीत विदर्भ 'अ‍ॅडव्हॉन्टेज' परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

अमरावती : पश्चिम विदर्भातील अमरावती, यवतमाळ अकोला, वाशीम व बुलडाणा या पाच जिल्ह्यांचा औद्योगिक विकास व्हावा, यासाठी नागपूरप्रमाणेच अमरावती येथे विदर्भ 'अ‍ॅडव्हॉन्टेज' परिषद आयोजित करावी, अशी मागणी तिवसा मतदारसंघाच्या आ. यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे.
अमरावतीत विदर्भ 'अ‍ॅडव्हॉन्टेज' परिषद आयोजित केल्यामुळे विभागातील पाचही जिल्ह्यांचा औद्योगिक विकास होईल. त्या अनुषंगाने आ. ठाकूर यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मंत्रालयात भेट घेऊन लक्ष वेधले.
नांदगाव पेठ येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत काही महिन्यांपूर्वी शासनाने टेक्सटाईल झोनकरिता ५०० हेक्टर जागा राखीव ठेवली. मात्र अद्यापही हा प्रकल्प सुरू झाला नाही. युवकांच्या हातालाही काम मिळत नसल्याने येथील युवक मोठ्या संख्येने रोजगारासाठी स्थलांतर करीत आहेत. नांदगाव पेठ येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत सोई सुविधेसाठी कोट्यवधींचा खर्च केला आहे. येथे आवश्यक सोई-सुविधा असूनही केवळ उद्योगधंदे नसल्यामुळे जनतेमध्ये नाराजी पसरली आहे. शासनाने उद्योगधंदे सुरू करावे आणि यासाठी अमरावतीत विदर्भ अ‍ॅडव्हॉन्टज परिषद आयोजित करावी, अशी मागणी आ. ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चेदरम्यान केली.

Web Title: In the Amravati Vidarbha 'Advanceage' conference, the Chief Minister will hold the meeting