शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती

By गणेश वासनिक | Updated: December 27, 2025 18:32 IST

जागा वाटपासंदर्भात अतिशय सकारात्मक चर्चा सुरू आहे- फडणवीस

Amravati Municipal Corporation Election | गणेश वासनिक, अमरावती: राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप-शिंदेसेनेत जागा वाटपावर सकारात्मक चर्चा झाली आहे. युती नक्कीच होईल, कोणतीही अडचण नाही, अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथे शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्यावतीने मुख्यमंत्री फडणवीस यांना डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

दरम्यान त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीतील जागावाटपाबाबत अत्यंत सकारात्मक भूमिका व्यक्त केली. जागा वाटपासंदर्भात अतिशय सकारात्मक चर्चा सुरू आहे. मला अपेक्षा आहे की लवकरच हा तिढा सुटेल. युती नक्की होईल आणि कोणतीही अडचण होणार नाही, असे फडणवीस म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, या चर्चेचे नेतृत्व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण करीत असून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजप नेते आशिष शेलार तसेच प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रातील प्रमुख नेते हे सर्वजण एकत्रितपणे चर्चा करीत आहेत. काल रात्रीपर्यंत घेतलेल्या माहितीप्रमाणे चर्चा अतिशय सकारात्मक मार्गावर आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : No hurdles for BJP-Shinde Sena alliance: CM Fadnavis clarifies.

Web Summary : CM Fadnavis stated in Amravati that discussions for BJP-Shinde Sena alliance for municipal elections are positive. He expects a resolution soon with no obstacles.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Amravati Municipal Corporation Electionअमरावती महानगरपालिका निवडणूक २०२६Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस