शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडीनंतर दुचाकीही चोरायचा अमित केने

By admin | Updated: March 30, 2017 00:11 IST

सराईत घरफोड्या अमित केनेला अखेर कोतवाली पोलिसांनी बुधवारी सकाळी यशोदानगरातून अटक केली. अमित केने दीड वर्षांपासून फरार होता.

आरोपीला अटक : २२ घरफोड्यांची कबुली, दुचाकी जप्त, ३१ पकड वॉरंटअमरावती : सराईत घरफोड्या अमित केनेला अखेर कोतवाली पोलिसांनी बुधवारी सकाळी यशोदानगरातून अटक केली. अमित केने दीड वर्षांपासून फरार होता. त्याच्याविरूद्ध आतापर्यंत ३१ पकड वाँरट निघाले असून तो घरफोड्या करण्यात पारंगत आहे. तो घरफोडी केल्यानंतर तेथूनच दुचाकी चोरून पसार व्हायचा. अमित केनेने आतापर्यंत २२ घरफोड्यांची कबुली दिली असून या चोऱ्यांमध्ये त्याने तब्बल २० लाखांपर्यंत ऐवज, रोख पळविल्याची माहिती पोलीससूत्रांनी दिली. चोरी, घरफोडी व दुचाकी चोरीत तरबेज आरोपी अमित हा दीड वर्षांपूर्वी कारागृहातून जामीनावर बाहेर आला. त्यानंतर त्याने घरफोड्यांचे सत्र सुरुच ठेवले होते. दरम्यान शहरात अनेक ठिकाणी घरफोडी, चोरी व दुचाकी चोरीच्या घटना उघड झाल्या. त्याअनुषंगाने पोलीस अमित केनेच्या मागावर होते. मात्र, तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. अमित केनेला पकडण्यासाठी आतापर्यंत ३१ वेळा अटक वॉरंट निघाले असून तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. अमित केने हा कुख्यात चोरटा पंकज गोंडाणेचा मित्र असून दोघेही घरफोडी व चोऱ्या करीत होते. दोन दिवसांपूर्वीच साईनगर व गाडगेनगर परिसरातील चोरीप्रकरणात अमितचा सहभाग असल्याचे चौकशीअंती स्पष्ट झाले आहे. बुधवारी गुप्त माहितीवरून कोतवालीच्या पोलीस निरीक्षक निलिमा आरज यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी अब्दुल कलाम, गजानन ढेवले, प्रफुल्ल खोब्रागडे, सागर ठाकरे, विनोद भगत यांनी सापळा रचून अमितला यशोदानगरातून अटक केली. त्याने राजापेठ, कोतवाली, नागपूरी गेट, बडनेरा, गाडगेनगर यापोलीस ठाण्यांच्या हद्दीतील तब्बल २२ घरफोड्यांची कबुली दिली. पोलिसांनी अमितला घटनास्थळी नेऊन शहानिशा केली आहे. अमितचे तडीपारीचे आदेश निघाले होते. त्यानंतर तो पसार झाला होता. अनेक घरफोड्या उघडकीस येऊ शकतात. (प्रतिनिधी)सराफा व्यावसायिक टार्गेटअमित केने हा घरफोडी करून सोने-चांदीचे दागिने काही सोनार व्यावसायिकांकडे विकायचा. सद्य:स्थिस्तीत ‘त्या’ सोनारांची नावे निष्पन्न झाली नाहीत. त्यांची नावे माहिती होताच त्या ज्वेलर्स संचालकाची चौकशी सुरु केली जाणार आहे. त्यांनाही ताब्यात घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.गाडगेनगर, साईनगर परिसरात चोरीदोन दिवसांपूर्वीच अमित केने याने साईनगर व गाडगेनगर परिसरात चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. गाडगेनगरच्या हद्दीतील रहिवासी वानखडे कुटुंबीय पुणे येथे गेले असता अमित केने याने त्यांच्या घराला लक्ष्य करून मुद्देमाल लंपास केला. त्याचप्रमाणे साईनगर परिसरात चोरी केल्याची कबुली दिली.