रुग्णवाहिकेचे दर निश्चित, जादा आकारल्यास कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:13 AM2021-05-19T04:13:53+5:302021-05-19T04:13:53+5:30

अमरावती : जिल्ह्यात कोविड साथ पाहता रुग्णवाहिकांची मागणी वाढली आहे. रुग्णवाहिकांधारकाकडून अवाजवी दर आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी येत ...

Ambulance rates fixed, action taken in case of extra charge | रुग्णवाहिकेचे दर निश्चित, जादा आकारल्यास कारवाई

रुग्णवाहिकेचे दर निश्चित, जादा आकारल्यास कारवाई

Next

अमरावती : जिल्ह्यात कोविड साथ पाहता रुग्णवाहिकांची मागणी वाढली आहे. रुग्णवाहिकांधारकाकडून अवाजवी दर आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडून रुग्णवाहिकेचे अधिकृत दर जाहीर करण्यात आलेले आहे. त्यापेक्षा अधिक दर आकारल्यास रुग्णवाहिकाधारकावर दंडात्मक कारवाईसह फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मंगळवारी दिला.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे रुग्णांची ने-आण करण्यासाठी रुग्णवाहिका रास्त दरात उपलब्ध असावी यासाठी प्राधिकरणाकडून दर निश्चित करण्यात आले. प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी, सहायक वाहतूक पोलीस आयुक्त किशोर सूर्यवंशी व सदस्य सचिव प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गित्ते यांच्या समितीने हा निर्णय घेतला.

वाहनात नोंदवही ठेवणे आवश्यक असून, त्यात रुग्णांचे नाव, पत्ता, तारीख, आकारलेले भाडे व रुग्णासोबतच्या व्यक्तीची नाव, पत्ता व सही असणे आवश्यक आहे. वाहन यांत्रिकदृष्ट्या सुरक्षित व स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी मालकाची असेल. प्राधिकरणाने निश्चित केलेल्या भाड्यात चालकाचा पगार व इंधन खर्च समाविष्ट आहे. जादा दर आकारणाऱ्या वाहनधारकावर प्रथम गुन्ह्यासाठी ५ हजार रुपये दंड, दुसऱ्या गुन्ह्यासाठी २० हजार रुपये दंड व तिसऱ्या गुन्ह्यासाठी फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. कुणाही रुग्णवाहिकाधारकाने जादा दर आकारल्यास तत्काळ आरटीओ कार्यालयाकडे तक्रार नोंदविण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गित्ते यांनी केले आहे.

बॉक्स

रुग्णवाहिकेच्या प्रकारानुसार भाडे दर

* *मारुती व्हॅन रुग्णवाहिकेसाठी प्रथम २५ किलोमीटरसाठी ८०० रुपये व त्यापुढील प्रत्येक किमीसाठी १५ रुपये दर निश्चित करण्यात आला आहे.

* *टाटा सुमो व मेटॅडोरसदृश वाहिकेसाठी प्रथम २५ किमीसाठी ९०० रुपये व त्यापुढे प्रति किमी १५ रुपये दर राहील.

* *टाटा ४०७ स्वराज माझदा आदी वाहनांत बांधणी केलेल्या रुग्णवाहिकेचे दर प्रथम २५ किमीसाठी १२०० रुपये व त्यापुढे प्रति किमी १८ रुपये राहील.

Web Title: Ambulance rates fixed, action taken in case of extra charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.