सोईसुविधांसोबतच पोलिसांच्या साप्ताहिक भत्त्यातही दुजाभाव

By Admin | Updated: June 16, 2014 23:17 IST2014-06-16T23:17:19+5:302014-06-16T23:17:19+5:30

पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सोईसुविधासोबतच साप्ताहिक भत्त्यातही दुजाभाव केला जात आहे. या कर्मचाऱ्यांना सोईसुविधाबाबत ‘मॅकेन्झी’ आयोगाने सुचविलेल्या शिफारशीही कागदोपत्रीच आहेत.

Along with the convenience, the police's weekly allowances also have a malafide intent | सोईसुविधांसोबतच पोलिसांच्या साप्ताहिक भत्त्यातही दुजाभाव

सोईसुविधांसोबतच पोलिसांच्या साप्ताहिक भत्त्यातही दुजाभाव

सुरेश सवळे - चांदूरबाजार
पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सोईसुविधासोबतच साप्ताहिक भत्त्यातही दुजाभाव केला जात आहे. या कर्मचाऱ्यांना सोईसुविधाबाबत ‘मॅकेन्झी’ आयोगाने सुचविलेल्या शिफारशीही कागदोपत्रीच आहेत. संघटित होण्याचा अधिकार नसल्यानेच शासन आपल्यावर अन्याय करीत असल्याची भावना पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये आहे.
राज्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कुठल्या सोईसुविधा द्याव्या यासाठी ब्रिटिश राजवटीत ‘मॅकेन्झी’ आयोग नेमण्यात आला. लॉर्ड मॅकेन्झी अध्यक्ष असलेल्या या आयोगाने पोलिसांचे कर्तव्यकाळ, सेवा, मानसिक स्थिती, कौटुंबिक आणि वैयक्तिक गरजा आदी बाबींचा अभ्यास केला. कर्तव्य बजावताना पोलिसांना अडचण येऊ नये, वाढीव कामाचा योग्य मोबदला मिळावा, त्यांची मानसिक स्थिती चांगली राहावी आदी शिफारशी ‘मॅकेन्झी’ आयोगाने आपल्या अहवालात सुचविल्या होत्या.
पोलीस कर्मचाऱ्याला आपल्या कुटुंबाला वेळ देता येईल, पर्यायाने पोलिसांचे कौटुंबिक वातावरण चांगले राहून मानसिक समाधानही लाभेल. यासाठी साप्ताहिक रजा देण्यात यावी, अशीही शिफारस या अहवालात करण्यात आली. ही शिफारस राज्याच्या गृह खात्याने स्वीकारली. आयोगाच्या शिफारसीनुसार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना साप्ताहिक रजा अग्रक्रमाने मिळावी, कुठल्याही परिस्थितीत ही सुटी रद्द करू नये, असे गृह खात्याचे आदेश आहे. मात्र कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सावधगिरी म्हणून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर हजर केले जाते. अचानक त्यांच्या सुट्या रद्द केल्या जातात. मागील वर्षी तर दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळातही पोलिसांच्या साप्ताहिक रजा रद्द करण्यात आल्या होत्या. अचानक त्यांच्या सुट्या रद्द केल्यामुळे अनेक कर्मचारी रजेपासून वंचित राहतात. मात्र साप्ताहिक रजेच्या दिवशी कामावर आल्यास बदली रजा मिळत नाही. केवळ १०० ते १५० रुपयांपर्यंत मोबदला दिला जातो.

Web Title: Along with the convenience, the police's weekly allowances also have a malafide intent