शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षेला परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:22 IST2021-03-04T04:22:53+5:302021-03-04T04:22:53+5:30

तालुका प्रतिनिधी/२ मार्च/फोटो आहे चांदूर रेल्वे : जिल्ह्यातील ११ परीक्षा केंद्रांवर शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षा २ मार्च ते ...

Allow Government Computer Typing Certificate Examination | शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षेला परवानगी द्या

शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षेला परवानगी द्या

तालुका प्रतिनिधी/२ मार्च/फोटो आहे

चांदूर रेल्वे : जिल्ह्यातील ११ परीक्षा केंद्रांवर शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षा २ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत घेण्याचे नियोजन केले होते. मात्र, ती पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा घेण्याबाबत परवानगी देण्यात यावी, अशी मागणी नसोसवायएफने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून केली.

नॅशनल एससी, एसटी, ओबीसी स्टुडन्ट अँड युथ फ्रंट (नसोसवायएफ) चे विभागीय अध्यक्ष धम्मपाल जामनिक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार, शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षा घेण्यासंदर्भात जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी २५ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेतली होती. या परीक्षेचे सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र मिळाले होते. परंतु, २ फेब्रुवारी रोजी या परीक्षा पुढे ढकलल्या. सर्व नियमांचे काटेकोर पालन करून या परीक्षा ४ मार्चपासून घेण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Allow Government Computer Typing Certificate Examination