शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
2
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
4
IPL 2026: वैभव-यशस्वीची धडाकेबाज जोडी फ्लॉप! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला मोठा दिलासा
5
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
6
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
7
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
8
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
9
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
10
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
11
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
12
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
13
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
14
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
15
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
16
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
17
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
18
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
19
सहलीत सेल्फीचा मोह जिवावर बेतला, मावळच्या धरणात तीन मित्र बुडाले; एकाला वाचविण्यात यश
20
...तेव्हाच मुंबई, गोवा ड्रग्जमुक्त होऊ शकेल; इथे दबा धरून बसलेत हजारो सलीम डोला
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्तांना होळीपूर्वी मदत वाटप

By admin | Updated: February 25, 2015 00:26 IST

मागील वर्षातील खरीप हंगामात झालेल्या पिकांच्या नुकसानापोटी शेतकऱ्यांना जाहीर झालेल्या चार हजार आठशे तीन रुपयांच्या पॅकेजचे वाटप ७ मार्च पूर्वी ...

जिल्हाधिकाऱ्यांना प्रधान सचिवांचे आदेशअमरावती : मागील वर्षातील खरीप हंगामात झालेल्या पिकांच्या नुकसानापोटी शेतकऱ्यांना जाहीर झालेल्या चार हजार आठशे तीन रुपयांच्या पॅकेजचे वाटप ७ मार्च पूर्वी म्हणजेच होळीपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. राज्याचे मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रीय यांनी घेतलेल्या २१ फेब्रुवारीच्या बैठकीत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना हे आदेश देण्यात आले. ही मदत शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करुन त्यातून शासकीय थकबाकीची वसुली करू नये, असेही निर्देश आहेत. शेतकऱ्यांना आता जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ही मदत कशी द्यावी, यासंदर्भातही राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. विभागीय आयुक्तांकडून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तहसीलदारांना निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. खात्यामध्ये मदतीची रक्कम जमा झाल्यानंतर त्यांना गरजेनुसार रक्कम काढता यावी, यासाठी सर्व बँकांना शाखांमध्ये पुरेशी रोख रक्कम उपलब्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बँकांमध्ये खाते नसलेल्या शेतकऱ्यांना पंतप्रधान जनधन योजनेंतर्गत बँक खाते उघडण्यास सूचित करण्यात आले आहे. मदत वाटप आढावा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने घेण्याचे निर्देशही या बैठकीत देण्यात आलेत. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी स्तरावर पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील निधी शेतकऱ्यांना वेळेवर कसा देता येईल, यावर प्रशासनाने भर द्यावा आणि ही आर्थिक मदत ७ मार्चपूर्वी सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत जमा करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हा प्रशासनाला प्रधान सचिवांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)