शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

संत्र्याला हवा २५ हजार हमीभाव

By admin | Updated: October 12, 2015 00:27 IST

वरुड-मोर्शी तालुक्यात संत्रा उत्पादकांची संख्या मोठी आहे. हजारो हेक्टर जमिनीत संत्रा उत्पादन घेतले जाते.

शासनाकडून घोर निराशा : संत्रा उत्पादक शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात संजय खासबागे वरुडवरुड-मोर्शी तालुक्यात संत्रा उत्पादकांची संख्या मोठी आहे. हजारो हेक्टर जमिनीत संत्रा उत्पादन घेतले जाते. परंतु इतर पिकांप्रमाणे संत्र्याला हमीभाव मिळत नसल्याने संत्रा उत्पादक हैराण झाला आहे. त्यामुळे संत्र्याला देखील अन्य पिकांप्रमाणे प्रति टन २५ हजार रुपयप्रमाणे हमीभाव जाहीर करण्याची मागणी संत्रा उत्पादकांनी केली आहे. जिल्ह्यातील संत्र्याचे क्षेत्र ७० हजार हेक्टर इतके आहे. जिल्ह्यातून वरुड-मोर्शी तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ३५ हजार हेक्टर जमिनीत संत्राचे पीक घेतले जाते. वरूड तालुक्यात संत्रा लागवडीखाली २१ हजार हेक्टर शेतजमीन असून उत्पादन घेणारी संत्रा झाडे १७ हजार ६७१ हेक्टर ६७ आर. जमिनीवर आहे. दरवर्षी मृग बहाराचे संत्रा उत्पादन घेतले जात होते. परंतु गेल्या चार वर्षांपासून सतत गारपिट आणि अतिवृष्टीमुळे संत्रा उत्पादकांना लाखो रुपयांचा फटका बसत असल्याने मृग बहारापेक्षा आंबिया बहाराची फळे घेण्यास ७० टक्के संत्रा उत्पादकांनी सुरुवात केली. जिल्ह्यात साडेपाच लाख टन संत्रा उत्पादन घेतले जाते. यामध्ये साडेतीन लाख टन आंबिया बहाराचे तर दोन लाख टन मृग बहाराचे उत्पादन घेतले जाते. ७० टक्के आंबियाबहार घेतला जातो. संत्रा उत्पादकांना सुगीचे दिवस येण्याकरिता मध्यस्थी करुन विकला जाणाऱ्या संत्र्याची पध्दत बंद होऊन थेट मार्केटिंगची व्यवस्था आणि अधिक क्षमतेचे प्रक्रिया केंद्र उभारल्यास संत्रा उत्पादकांना चांगले दिवस येतील. परंतु हे होणार तरी कधी? हा प्रश्न आहे. संत्र्यापासून ९०० कोटी रुपयांपेक्षा अधिक आर्थिक उलाढाल करणारी आणि हजारो मजुरांच्या हाताला काम देणारी बाजारपेठ निर्माण होऊ शकते. परंतु राजाश्रया अभावी संत्रा उत्पादक परंतु पणन आणि प्रक्रिया नसल्याने संत्रा उत्पादकांना अखेरची घरघर लागण्याची शक्यता आहे. राज्य, केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांकडून कृषी उत्पादनामध्ये ज्वारी, तूर, कापूस, ऊस, संत्रा कलमा यासह आदी काही पिकांना शासनाकडून हमीभावाने खरेदी केले जाते. याच धर्तीवर संत्रासुध्दा हमीभावाने राज्य शासनाने खरेदी करुन वायनरी, रस प्रक्रिया केंद्र आदींसाठी संत्र्यांचा वापर केल्यास बहुगुणी संत्र्याला नक्कीच चांगले दिवस येतील, अशी अपेक्षा आहे. मुख्यमंत्र्यांनी अलीकडेच दिलेल्या आश्वासनामुळे संत्रा उत्पादकांच्या आशा उंचावल्या आहेत.