शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

वाघोडा ते फुबगाव फाटा रस्ता दुरुस्तीसाठी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:28 IST

फोटो - नांदगाव खंडेश्वर : वाघोडा ते फुबगाव फाटा रस्त्याच्या परिपूर्ण दुरुस्तीच्या मागणीकरिता वाघोडा येथील नागरिकांनी बांधकाम कंत्राटदार कंपनीची ...

फोटो -

नांदगाव खंडेश्वर : वाघोडा ते फुबगाव फाटा रस्त्याच्या परिपूर्ण दुरुस्तीच्या मागणीकरिता वाघोडा येथील नागरिकांनी बांधकाम कंत्राटदार कंपनीची वाहने वाघोडा येथे सोमवारी रोखली.

तीन वर्षांपासून समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. अवजड वाहनांमुळे वाघोडा ते फुबगाव फाटा हा रस्ता पूर्ण नादुरुस्त झाला आहे. रस्त्यात जागोजागी खड्डे पडले आहेत. वाघोडा, शेलू नटवा, फुबगाव, सुलतानपूर, धानोरा शिक्रा, बेलोरा आदी गावातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्याकरता हा रस्ता महत्त्वाचा आहे. अवजड वाहतुकीकरिता प्रतिबंधित असलेल्या या मार्गावर रस्ता दुरुस्त करून देण्याच्या अटीवर शासनाने अवजड वाहतुकीस परवानगी दिली होती, असे आंदोलकांचे म्हणणे होते. समृद्धी महामार्गाचे काम या भागात पूर्णत्वास आले असताना रस्त्याच्या दुरुस्तीकरिता चालढकल होत आहे. वाघोडा व परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा निवेदने देऊनसुद्धा अद्याप दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली नाही. विशेष प्रकल्प विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग (बडनेरा) यांनी अनेक वेळा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला संबंधित कंपनीकडून या रस्त्याची दुरुस्ती करून घेण्याबाबत पत्रव्यवहार केला. परंतु अद्यापही या रस्त्याची दुरुस्ती होत नसल्यामुळे ३० ऑगस्ट रोजी वाघोडा येथील नागरिकांनी संबंधित कंपनीची वाहने अडवून रोष व्यक्त केला. यावेळी एम.एस.आर.डी.सी.चे उपअभियंता ए.एन. ढेरे व एनसीसी प्रतिनिधी बी.के. सिंह यांनी नांदगाव खंडेश्वरचे ठाणेदार हेमंत ठाकरे यांच्या उपस्थितीत गावकऱ्यांना रस्ता दुरुस्तीसंबंधी उच्चस्तरीय बैठकीचे लेखी आश्वासन दिल्यानंतर गावकऱ्यांनी आंदोलन तात्पुरते मागे घेतले असल्याचे आंदोलकांनी सांगितले. यावेळी काँग्रेसचे विनोद जगताप, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव सुनील मेटकर, वाघोडा येथील उपसरपंच ओमप्रकाश सावळे, अजय भोयर, बबलू गावनर, तुकाराम भलावी, बाळू सुलताने, ज्ञानेश्वर भगवे, सोमदास मेहेंगे, रवि मेटकर, अजय भगत व गावकरी उपस्थित होते.

310821\1413-img-20210831-wa0001.jpg

वाघोडा ते फुबगाव फाटा रस्ता दुरुस्ती साठी आंदोलन.