पुन्हा चार : मसानगंज नवा हॉटस्पॉट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 05:01 IST2020-05-20T05:00:00+5:302020-05-20T05:01:20+5:30

मसानगंज भागात २९ एप्रिलला ६४ वर्षीय व्यक्ती कोरोनाची पहिला संक्रमित होती. त्यानंतर ८ मे रोजी दुसऱ्या बाधिताची नोंद झाली. ५३ वर्षीय संक्रमित उपचारादरम्यान दगावला. यानंतर मसानगंज भागात सातत्याने कोरोनाचे संक्रमित व्यक्ती निष्पन्न होत आहेत. नंतरच्या दहा दिवसांत कोरोनाचे १२ संक्रमित व्यक्ती या भागात आढळल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालात स्पष्ट झाले आहे.

Again four: Masanganj new hotspot | पुन्हा चार : मसानगंज नवा हॉटस्पॉट

पुन्हा चार : मसानगंज नवा हॉटस्पॉट

ठळक मुद्देमसानगंज २, रतनगंज १, ताजनगर १ : जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांनी केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरातील मसानगंज कंटेनमेंटमध्ये एकूण १३ संक्रमित आहेत. यापैकी दहा दिवसांत १२ संक्रमितांची नोंद झाली. जिल्ह्यात सद्यस्थितीत मसानगंज भागात सर्वाधिक बाधित व्यक्ती समोर येत असल्याने हा भाग कोरोनाचा नवा हॉटस्पॉट बनला आहे. या भागातील नागरिकांचे आरोग्य पथकाला सहकार्य मिळत असल्याने अधिकाधिक चाचण्या होणे महत्त्वाचे आहे.
मसानगंज भागात २९ एप्रिलला ६४ वर्षीय व्यक्ती कोरोनाची पहिला संक्रमित होती. त्यानंतर ८ मे रोजी दुसऱ्या बाधिताची नोंद झाली. ५३ वर्षीय संक्रमित उपचारादरम्यान दगावला. यानंतर मसानगंज भागात सातत्याने कोरोनाचे संक्रमित व्यक्ती निष्पन्न होत आहेत. नंतरच्या दहा दिवसांत कोरोनाचे १२ संक्रमित व्यक्ती या भागात आढळल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालात स्पष्ट झाले आहे. या भागात ११ मे रोजी तीन महिला व एक पुरुष, १५ मे रोजी ६० वर्षीय व्यक्ती, १६ मे रोजी ४८ वर्षीय पुरुष, १७ मे रोजी ३० वर्षीय तरुण व ५५ वर्षीय महिला, १८ मे रोजी २२वर्षीय तरुण व १९ मे रोजी ४५ व ५० वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह आल्याने संक्रमितांची संख्या १३ झाली आहे.
जिल्हाधिकारी शैलेश नवाल व महापालिकेचे आयुक्त प्रशांत रोडे यांनी मंगळवारी संयुक्त पाहणीदरम्यान येथील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नगरसेवक राजेश साहू, सहायक आयुक्त योगेश पिठे, नागपुरी गेटचे पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे आदी उपस्थित होते.

पथकांच्या गृहभेटी
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने मसानगंज भागात आरोग्य विभागाच्या पथकांकडून गृहभेटी दिल्या जात आहेत. या पथकांचा आढावा सहायक आयुक्त योगेश पिठे व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे घेत आहेत. अग्निशमन विभागाच्या माध्यमातून या भागात सॅनिटायझेशन करण्यात आले.

कोरोनाग्रस्तांची संख्या ११५
विद्यापीठाचे प्रयोगशाळेद्वारा मंगळवारी प्राप्त अहवालानुसार मसानगंज कंटेनमेंटमध्ये ४५ व ५० वर्षीय, ताजनगरला ३८ वर्षीय व रतनगंज या नव्या भागात ६० वर्षीय महिलेचा स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या आता ११५ वर पोहोचली आहे. यामध्ये १३ मृत, कोरोनामुक्त ६३ व ४० रुग्णांवर कोविड रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बाधिताचे घराकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले व संपर्कातील व्यक्तींचे थ्रोट स्वॅब घेण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

Web Title: Again four: Masanganj new hotspot