शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

‘ब्रेकअप’नंतर स्थानिक कार्यकर्त्यांना ‘अच्छे दिन’

By admin | Updated: September 27, 2014 23:08 IST

महायुती पाठोपाठ आघाडीचाही घटस्फोट झाल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. आतापर्यंतच्या दुहेरी लढती आता बहुरंगी लढतीमध्ये परिवर्तित झाल्यात. याचा फटका उमेदवारांना बसला आहे.

गजानन मोहोड - अमरावतीमहायुती पाठोपाठ आघाडीचाही घटस्फोट झाल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. आतापर्यंतच्या दुहेरी लढती आता बहुरंगी लढतीमध्ये परिवर्तित झाल्यात. याचा फटका उमेदवारांना बसला आहे. मात्र, यामुळे तळागाळातील कार्यकर्त्यांचे भाव वधारले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी पितृपक्ष संपल्यानंतर २५ सप्टेंबर म्हणजे घटस्थापनेपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली. याच दिवशी सायंकाळी महायुती व आघाडी यांच्यामधील युती फिस्कटली. परिणामी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना यांचे स्वतंत्र उमेदवार सध्या निवडणूक रिंगणात आहेत. धक्कादायक घडामोडीनंतर जिल्ह्याचे समीकरण रातोरात बदलले. इच्छुक उमेदवारांच्या पक्षनिष्ठा बदलल्या, नेत्यांनी पक्षबदल केल्याने निष्ठावान कार्यकर्त्यांची गोची झाली. उमेदवारांनाही नवीन घरठाव केलेल्या पक्षातील नाराज कार्यकर्त्यांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. या नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी करताना उमेदवारांच्या नाकीनऊ येत आहे. ज्यांच्या समवेत खांद्याला खांदा लावून दोन दशक काम केले त्यांच्या विरोधात प्रचार करण्याची वेळ कार्यकर्त्यांवर आली आहे. तूर्तास काही पदाधिकाऱ्यांनी घरी बसणे पसंत केले आहे. या प्रतिकूल परिस्थितीत अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करताना शक्तीप्रदर्शनासाठी हजारो कार्यकर्त्यांचा फौजफाटा जमा करण्याची कसरत उमेदवारांना करावी लागत आहे. यामुळे तळागाळातील कार्यकर्त्यांचे भाव मात्र वधारले आहेत. राजकारणातल्या या धक्कादायक तंत्रानंतर कार्यकर्त्यांची चंगळ सुरू झाली आहे. एरवी कार्यकर्त्यांची, सहकाऱ्यांची आठवण न करणाऱ्या राजकीय मंडळींना आता सर्वांचा आधार घ्यावा लागत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना, मनसे, रिपाइंसह सर्वच पक्षांना या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.