शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

२० वर्षांनंतर आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाला यश

By admin | Updated: January 4, 2016 00:14 IST

अप्पर आदिवासी विकास विद्यार्थ्यांनी विभागाला बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता.

उपोषणाची यशस्वी सांगता : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासनअमरावती : अप्पर आदिवासी विकास विद्यार्थ्यांनी विभागाला बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता. त्याच इशाराप्रमाणे २००० विद्यार्थ्यांनी जीवन फोपसे कृती समिती अध्यक्ष संदीप तोरकड, प्रवीण पोतरे यांच्या नेतृत्वात २८ डिसेंबरला केले आणि हक्काचा लढा सुरू झाला व डिसेंबरला बेमुदत उपोषणाची यशस्वी सांगता झाली. त्यामधील पुढील मागण्या मान्य करण्यात आल्या. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी आदेश क्र. २१८८, २९ डिसेंबर २०१५ अन्वये आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह रहाटगाव ४,९९,७०,००० रुपयांची प्रशासकीय मंजुरी प्रदान केली. इमारत बांधकामासाठी भूमिपूजनापूर्वी बांधकाम निविदा मागवून वर्क आॅर्डर देणे आवश्यक आहे. सदर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नियमानुसार किमान दीड ते दोन महिने पूर्ण होऊन वसतिगृहाचे बांधकाम सुरू होणार आहे. दुसरी मागणी म्हणून ३ वर्षे कालावधीसाठी युपीएससी/ एमपीएससी शिकवणी वर्ग सुरू करण्याची धोरणात्मक बाब शासन स्तरावरील असून त्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव सादर करण्याची कार्यवाह करण्यात आली. प्रकल्प अधिकारी धारणी यांनी एन.बी. अंतर्गत २५,००,००० रुपयांची एमपीएससी पूर्व परीक्षेची तयारीकरिता ६ महिन्यांचा कालावधीसाठी २७८ विद्यार्थ्यांकरिता योजना मंजुर केली आहे. अंदाजित खर्च प्रति विद्यार्थी ६ महिन्यांकरिता रुपये ९ हजार खर्च अपेक्षित आहे. पुढील वर्षी प्रस्तावित योजनेमध्ये एकूण ५० विद्यार्थ्यांक२तिा निवासी स्वरुपाची योजना प्रस्तावित करण्यात येणार आहे. या दोनही मागण्या मान्य होऊन २० वर्षात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांच्या लढ्याला न्याय मिळाला आहे. उपोषणाच्या शेवटच्या दिवशी पालकमंत्री प्रवीण पोटे, खासदार आनंदराव अडसूळ, आ. सुनील देशमुख, आ. यशोमती ठाकूर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, आदिवासी उपायुक्त नितीन तायडे यांनी उपोषण सोडविले व पालकमंत्री पोटे, खा. अडसूळ यांनी १ जानेवारी ला दुपारी ज्ञान प्रबोधनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कृती समितीच्या अध्यक्ष जीवन फोपसे, सुरेश मुकाळे, राजू काळे, सोनल आत्राम व कृती समिती सदस्यांनी भेट घडवून आणली. या भेटीमध्ये महाराष्ट्रातील सर्व आदिवासी वसतिगृहांचे बांधकाम त्वरित करावे व त्यामुळे आदिवासी मुला-मुुलींना दर्जेदार सुविधा मिळतील व शासनाचा भाड्याच्या इमारतीवर होणारा खर्च वाचेल. आदिवासी एटीसी प्रशासकीय अधिकारी हे आयएएस दर्जाचे असावे व ते स्थायी स्वरुपाचे असावे व ते आदिवासी असावेत. जेणे करुन समाजाला योग्य तो न्याय मिळेल व शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविल्या जातील. जिल्हाधिकारी व विभाग पातळीवर आदिवासी विभागाचे स्वतंत्र ग्रंथालय असावे, त्यामुळे वाचन संस्कृती रुजेल व समाजातील सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक अशी सर्व स्तरातून प्रगती होईल. या सर्व समस्यांवर मुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष देऊन प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.