शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेवरून सभा स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2016 00:13 IST

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या सूचेनवरून महापालिकेत मंगळवारी आयोजित आमसभा स्थगित करण्यात आली.

‘स्थायी’चा वाद : खोडकेंना निरोप तर शेखावतांना ‘मॅसेज’अमरावती : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या सूचेनवरून महापालिकेत मंगळवारी आयोजित आमसभा स्थगित करण्यात आली. तत्पूर्वी याबाबत खा. चव्हाण यांनी संजय खोडके यांना निरोप देऊन, तर बबलू शेखावत मोबाईलवर मेसेज पाठविला होता, हे विशेष. स्थायी समिती सदस्य निवडीवरून काँग्रेसमध्ये उफाळलेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर ही आमसभा स्थगित करण्यात आली.महापालिकेत स्थायी समिती सदस्य निवडीवरुन सर्वच पक्षांत कमालीची स्पर्धा आहे. परंतु काँग्रेसमध्ये मोठी रस्सीखेच सुरू आहे. मंगळवारच्या आमसभेत नव्या आठ सदस्यांची निवड अपेक्षित होती. मात्र, सकाळी ११ वाजता वंदे मातरम्ने सभा सुरू होताच लगेच दुसऱ्या क्षणी राष्ट्रवादी फ्रंटचे गटनेता अविनाश मार्डीकर यांनी महापौरांना नागपूर येथे पक्ष बैठकीला जायचे कारण सांगून आमसभा स्थगित करण्याचा प्रस्ताव ठेवला. प्रस्तावाला रिपाइं- जनविकासचे गटनेता प्रकाश बनसोड, चेतन पवार यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर महापौर नंदा यांनी दोन दिवसांनी पुन्हा आमसभा घेण्याचा निर्णय घेऊन सभागृहातून बहिर्गमन केले. ११ वाजता सुरू झालेली आमसभा अवघ्या ७ मिनिटांत गुंडाळली गेली. सभा स्थगित होताच महापौर, राकाँचे गटनेते अविनाश मार्डीकर, स्थायी समितीचे माजी सभापती चेतन पवार, मिलिंद बांबल, हमीद शद्दा आदींनी संजय खोडके यांचे कार्यालय गाठले. येथे प्रदेशाध्यक्षांनी केलेल्या सूचनांबाबत चर्चा झाली. दुसरीकडे पक्षेनता बबलू शेखावत, उपमहापौर शेख जफर, स्थायी समितीचे सभापती विलास इंगोले, आसीफ तव्वकल, रतन डेंडुले, नूर खॉ आदींनी काँग्रेसनगर स्थित ‘देवीसदन’ येथे जाऊन रावसाहेब शेखावत यांची भेट घेतली. येथेही घडलेल्या घडामोडींबाबत चर्चा झाली. काँग्रेसने स्थायी समितीत सदस्य म्हणून आसिफ तव्वकल आणि कांचन डेंडुले यांची नावे निश्चित केली होती. रावसाहेब शेखावत यांनी रतन डेंडुले यांना बक्षिस देण्यासाठी काँग्रेसमधून कांचन डेंडुले यांचे नाव पाठविण्याची तयारी केली होती. मात्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी शेखावतांच्या या खेळीला ‘ब्रेक’ दिला. (प्रतिनिधी)