शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
3
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
4
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
5
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
6
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
7
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
8
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
9
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
10
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
11
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
12
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
13
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
14
Marathi News LIVE : इराणच्या हवाई हल्ल्यात तीन भारतीय जखमी, भारताने व्यक्त केला संताप 
15
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
16
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
17
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
18
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
19
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
20
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

परतवाड्यात बेरोजगारांना फसविणारी टोळी सक्रिय

By admin | Updated: May 19, 2015 00:12 IST

सुशिक्षित बेरोजगारांना हेरून नोकरीचे आमिष देत त्यांना लाखो रूपयांचा गंडा घालणारी टोळी परतवाडा शहरात सक्रिय झाली आहे.

टोळी सक्रिय : पोलिसात तक्रार, लाखोंची लुबाडणूकनरेंद्र जावरे अचलपूर सुशिक्षित बेरोजगारांना हेरून नोकरीचे आमिष देत त्यांना लाखो रूपयांचा गंडा घालणारी टोळी परतवाडा शहरात सक्रिय झाली आहे. यासंदर्भात परतवाडा पोलिसात तक्रार दाखल झाली असून जवळपास पंधरा युवक या जाळ्यात अडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.राजेंद्र रामकृष्ण नेमाडे (३६, रा. धामणगाव गढी) असे फसवणूक करणाऱ्या इसमाचे नाव असून नवजीवन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा तो सचिव असल्याचे परतवाडा पोलिसात दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे. संगीता सतीश अग्रवाल (३८, रा. देवमाळी) या महिलेच्या तेजस नामक मुलास शासनांतर्गत असलेल्या योजनासंदर्भात आपल्या संस्थेत नोकरी लावून देत असल्याची बतावणी करून २ लक्ष ७० हजार रूपयांनी फसवणूक व रक्कम परत मागितली असता अश्लील शिवीगाळ केल्याची फिर्याद परतवाडा पोलिसात केली आहे. फिर्यादी महिला परतवाडा येथे शिवणक्लास चालविते. उपरोक्त संस्थेचा सचिव राजेंद्र नेमाडे हा नोव्हेंबर २०१३ मध्ये आपल्या घरी आला होता. त्याने आपणास संस्थेला मिळालेल्या शासकीय अनुदानाबाबत बनावट कागदपत्रे दाखविली व माझ्या मुलास संस्थेमध्ये कॉम्प्युटर आॅपरेटर पदावर नोकरी लावून देण्यासाठी दरमहा पंधरा हजार रूपये वेतन देण्याचे सांगितले. त्याच्या आश्वासनानंतर त्याच्यावर विश्वास ठेवून २ लक्ष ७० हजार रूपयांची मागणी केल्यामुळे मी धनादेश दिला. सदर धनादेश त्यांच्या बँक खात्यामधून वळविला. ३० नोव्हेंबर २०१३ रोजी राजेंद्र नेमाडे याने संस्थेच्या नेमणुकीचे आज्ञापत्र दिले. तीन महिन्यांत रुजू करण्याचे सांगण्यात आले. मात्र त्यानंतर त्यांच्याशी संपर्क केला असता वारंवार दोन ते तीन महिन्यात रुजू करून घेतो, असे वारंवार सांगण्यात आले. परंतु प्रत्यक्षात रुजू करून घेतले नाही. त्यामुळे तक्रार दाखल केली.शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकीराजेंद्र नेमाडे हा १२ मे २०१५ रोजी आपल्या घरी तीन ते चार इसमांना घेऊन आला व त्याला मुलगा तेजसच्या नोकरीसंदर्भात विचारणा केली असता त्याने आपणास अश्लील शिवीगाळ व पैसे परत न करण्याची धमकी दिल्याचे संगीता अग्रवाल यांनी तक्रारीत नमूद केले आहे. जास्त तगादा लावल्यास जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे त्यांचे म्हणणे आहे. राजेंद्र नेमाडेवर कारवाही करण्याची मागणी त्यांनी केली आहे.तेजस पहिला बळी!संस्थेत नोकरीचे आमिष देवून फसवणूक झालेला तेजस अग्रवाल हा पहिला बळी पुढे आला आहे. त्याची आई संगीता अग्रवाल यांनी पोलिसात तक्रार दिली तर शहरात अजूनही सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून त्यांच्याकडूनसुद्धा लाखो रूपयांची लुबाडणूक झाल्याचा संशय असून त्यांनी पुढे येण्याचे आवाहन अग्रवाल कुटुंबीयांनी केले आहे. परतवाडा पोलिसांनी तक्रार घेऊन चौकशीला प्रारंभ केला आहे. यात किती युवकांची फसवणूक झाली हे पुढे येणार आहे.