शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
2
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
3
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
4
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
5
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
6
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
7
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
8
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
9
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
10
‘तुम्ही घुसखोर आहात का? हे सिद्ध करण्याची वेळ आणू नका’ म्हाडाच्या उपाध्यक्षांची नागरिकांना दमदाटी
11
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
12
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
13
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
14
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
15
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
16
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
17
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
18
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
19
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
20
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेची नियमबाह्य पशुपालकांविरुद्ध कारवाई

By admin | Updated: May 7, 2015 00:01 IST

विनापरवानगीने पशुपालन अथवा दुग्ध व्यवसाय करताना सार्वजनिक आरोग्य धोक्यात येत असेल तर आता ..

छायानगरात जमाव : तीन म्हशींसह बछडे ताब्यातअमरावती : विनापरवानगीने पशुपालन अथवा दुग्ध व्यवसाय करताना सार्वजनिक आरोग्य धोक्यात येत असेल तर आता महापालिका नियमबाह्य पशुपालकांविरुद्ध कारवाई होणार आहे. याच श्रृंखलेत बुधवारी येथील छायानगरात नियमबाह्य पशुपालकांविरुद्ध कारवाई करुन तीन म्हशींसह दोन बछडे ताब्यात घेतले आहे. या कारवाई दरम्यान परिसरात प्रचंड जमाव निर्माण झाला असताना पोलिसांना हा जमाव पांगविताना कसरत करावी लागली, हे विशेष.आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या आदेशानुसार पशुशल्य चिकित्सक सचिन बोंद्रे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई सकाळच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात करण्यात आली. स्थानिक छायानगरात शहेजाद खान अहमद खान यांचा पशुपालनाचा व्यवसाय आहे. मात्र त्यांच्याकडे पशुपालन करण्याचा परवाना नसताना त्यांनी म्हशीपालनासाठी भला मोठा गोठा बांधला आहे. त्यांच्या या पशुपालन व्यवसायाचा त्रास शेजारील शेख कासम यांना कायम होता. पशुपालन व दूग्धव्यवसाय करताना परवाना असणे अनिवार्य आहे. परंतु शेख कासम यांनी महापालिका आयुक्तांकडे या नियमबाह्य पशुपालन व्यवसायाची सातत्त्याने तक्रार करुन प्रशासनाचे लक्ष वेधले. या तक्रारीच्या अनुषंगाने नियमबाह्य पशुपालन व्यवसाय करणारे शहेजाद खान यांना पशुशल्य चिकित्सक विभागामार्फत तीन नोटीस बजावल्या. त्यानंतर शहेजाद खान यांनी एकाही नोटीसला उत्तर दिले नाही. त्यामुळे पशुशल्य चिकित्सक सचिन बोंद्रे यांनी अनिधकृत पशुपालन व्यवसाय सुरु असल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली. आयुक्त गुडेवार यांच्या आदेशानुसार या पशुपालन व्यवसायाच्या गोठ्याला कुलूप ठोकले. तसेच ही कारवाई करताना तीन म्हशी व तीन बछडे ताब्यात घेतले. अचानक पशुपालन व्यवसायाविरुद्ध कारवाई होत असल्याने परिसरात जमाव एकत्रित आला. नागपुरी गेट पोलीस ठाण्याचे निरिक्षक दत्ता गावडे यांनी जमावाला पांगविण्यासाठी पोलीस खाक्या वापरावा लागला. दरम्यान तीन म्हशी व दोन बछडे हे ताब्यात घेतल्यानंतर येथील गौरक्षणमध्ये त्यांना पाठविण्यात आले. नियमबाह्य पशुपालन करणाऱ्या शहेजाद खान यांच्या विरुद्ध महापालिका अधिनियम ३८३, ३७६ (अ), कलम २२, २३, २४ प्रकरण- १४ यानुसार महाराष्ट्र नागरी क्षेत्रात गुरे पाळणे नियमानुसार स्वच्छता व आरोग्यास घातक व उपद्रवी पशुपालनावर बंदी आणण्याच्या महापालिका अधिनियमानुसार १९७६ च्या कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई दरम्यान पोलीस निरिक्षक गावडे, पशुशल्य चिकित्सक सचिन बोंद्रे, पोलीस जमादार मुऱ्हेकर, देशमुख, सागर गवई यांच्यासह खासगी कर्मचारी वर्ग उपस्थित होता.परवाने जारी करण्याची प्रक्रिया मंदावलीशहरात पशुपालकांना परवाने जारी करण्याबाबत यापूर्वी महापालिका स्थायी समितीत ठराव मंजूर करण्यात आला होता. पशुंच्या वर्गवारीनुसार परवान्याने दर निश्चित करण्यात आले होते. परंतु त्यानंतर ही प्रक्रिया मंदावली. परवाने घेऊनच पशुपालन करावे, याअनुषंगाने पशुपालकांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या. नवीन शासन निर्णयानुसार महापालिका हद्दित दूग्ध अथवा पशुपालन व्यवसाय करणाऱ्यांना परवाने घेवूनच हा व्यवसाय करता येणे शक्य आहे. अन्यथा कारवाईच्या सामोरे जावे लागेल, हे वास्तव आहे.कारवाई निरंतर सुरु राहील- आयुक्तनियमबाह्य पशुपालन व्यवसाय करणे आता शक्य नाही. ज्यांच्याकडे पशुपालनाचे परवाने नाहीत, अशांनी परवाने काढून घेणे अनिवार्य आहे. पशुपालन व्यवसायासंदर्भात नागरिकांची तक्रार आल्यास आता थेट फौजदारी केली जाईल, असे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी सांगितले. शहरात ६० ते ७० हजार पशुंची संख्या असल्याची प्रथमदर्शनी माहिती आहे.शहरात १७० पशुपालनाचे परवानेजिल्हा दुग्ध व्यवसाय विभागाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या परवान्यांमध्ये शहरात केवळ १७० पशुपालनाचे परवाने देण्यात आल्याची नोंद आहे. मात्र या परवान्याच्या तुलनेत पशुपालकांची संख्या अधिक आहे. यापुर्वी स्थायी समितीत पशुपालनाच्या परवान्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी झाली तर तिजोरीत उत्पन्न वाढेल, यात दुमत नाही.